परीक्षा घेण्यात आलेल्या १३ संवर्गांपैकी कनिष्ठ अभियंता गट ब (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या दोन संवर्गातील पदांची Provisional Merit List जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. तरी वरील दोन पदांबाबतचा संभ्रम सा. बां. विभागाने दुर करावा ही विनंती.
सा बां विभागातर्फे कनिष्ठ अभियंता गट ब पदासाठी २६ जानेवारी रोजी Merit List संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर Merit List प्रमाणे अंतिम निवड यादी जाहीर करुन उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता चालू होण्या पूर्वी पूर्ण करावी ही नम्र विनंती.
राज्यातील नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये हजारो जागा रिक्त असताना भरती प्रक्रियेत केवळ ४०% जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली असून उर्वरित ६०% जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. सदर भरती ५ वर्षातून एकदा होत असून लाखो विद्यार्थी या परीक्षांची गेली अनेक वर्षापासून तयारी करत आहेत. कमी जागांच्या भरतीची जाहिरात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना युवा वर्गात आहे.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे की, नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून आपण या भरती प्रक्रियेत लक्ष घालावे व सर्व १००% रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी..
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@Mpsc_Andolan@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
संदर्भ : आप महाराष्ट्र / २००१२०२४/००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय :- नगरपरिषद भरती २०२३ जागावाढ करण्याबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये, आपणास विनंतीपूर्वक पत्र लिहीत आहोत की राज्यात सुरु असलेल्या नगरपरिषद भरती संदर्भात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न आहेत. उपलब्ध माहितीनुसार हि भरती केवळ ४०% जागांवर होत आहे. उर्वरित ६०% जागा रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही. नागरपरिषदांच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो नागरिकांचे अनेक प्रश्न जाटिल असून कर्मचारी कमी असल्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. कमी कर्मचाऱ्यांमुळे नागरपरिषदेवर मोठा ताण येतो. सदर भरती ५ वर्षातून एकदा होत असून लाखो विद्यार्थी या परीक्षांची गेले अनेक वर्ष तयारी करत आहेत. कमी जागांच्या भरतीची जाहिरात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना संतप्त युवक युवतींमध्ये आहे.
नगर विकास अधिकारी व नगरपरिषद संचनालय अधिकारी जाणीवपूर्वक आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. नगर विकास खाते व नगरपरिषद महासंचनालयातील अधिकारी जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टचे दाखले देत न्यायालयाची प्रतिमा मलिन करत आहेत असा लाखो विद्यार्थ्यांचा अत्यंत गंभीर आरोप आहे. नगरपरिषद संचालनालयामार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुद्दा क्रमांक ३.१.१ व ३.१.५ मध्ये स्पष्ट नमूद आहे की अंतिम निकाल लागे पर्यंत शासनाचे आदेश आल्यास जागा वाढ होऊ शकते. मुख्यमंत्री या नात्याने आपली आदेशाचे अधिकारी वर्ग पालन करत नाही असा याचा अर्थ होतो. याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. उत्तम प्रशासनाचा कारभार राज्याच्या प्रगतीला अत्यंत गरजेचा आहे.
आम आदमी पार्टी नेहमीच प्रशासनाच्या पारदर्शक व उत्तम कारभाराचे समर्थन करते व प्रशासनाला सहकार्य करण्याची आमची नेहमी भूमिका राहिली आहे.
आपण स्वतः या विषयात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
@mieknathshinde@AAPMaharashtra@SandeepPathak04@AUThackeray@MahavikasAghad3@iambadasdanve@VijayWadettiwar@ErAnandPujari
मा. देवेंद्र जी,
आपण गृहमंत्रीपद स्वीकारल्यापासून जवळ जवळ सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटला आहेत. आपण गृहमंत्री पदास न्याय देऊ शकले नाही. तुमच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
आपल्याला हे पद झेपत नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा द्यावा.
#फडणवीस_राजीनामा_द्या
@AAPMaharashtra
@degree_holders
@AamAadmiParty@BJP4Maharashtra
#DhananjayShinde
#नोकर_भरतीमधील_पेपरफुटी
लातूरात #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटला असल्याचा विद्यार्थांचा आरोप.
आज सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या अशा ज्युनिअर इंजिनियर पदाची परीक्षा लातूरातील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे होती. काही ठराविक उमेदवारांना परीक्षा केंद्रामार्फत बाहेरून #चिठ्ठी द्वारे उत्तरे पुरविण्यात आली आहेत. इतर उमेदवारांनी याचा विरोध केला असता, पर्यवेक्षकांनी चिठ्ठी गायब करून उमेदवाराचा बचाव केल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
PWD विभागाची अनेक पदे वर्ग-२/३ स्तरावरील आहे, जर त्या उमेदवाराला बाहेरून उत्तरे आली म्हणजे राज्यातून कोठून तरी पेपर फोडून उत्तरे पाठविण्यात येत आहेत, नक्की कोण कोणत्या जिल्ह्यात असे प्रकार सुरू आहेत याचा छडा लागलाच पाहिजे.
आधी परीक्षा पारदर्शक रित्या घेण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यानंतरच परीक्षा घ्याव्या. तसेच लातूर मधील या परीक्षा केंद्राची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात यावी.
हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? फडणवीस शिंदे सरकार पेपरफुटी रोकण्यस सपशेल अप यशी ठरली आहे. पेपरफुटी कायद्याच्या नावावर आमच्या माथी फक्त एक समिती नेमून बोळवण करण्यात आली. PWD घोटाळ्याबाबत निर्णय घ्यावा आणि याच अधिवेशनात पेपरफुटी कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे.
पेपरफुटी साठी राज्याच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध.
#फडणवीस_राजीनामा_द्या
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@RRPSpeaks@VijayWadettiwar@satejp@iambadasdanve@NANA_PATOLE@Awhadspeaks@supriya_sule@KunalNitinRaut
@DGPMaharashtra In this lockdown can i get out of homes for agricultural purpose for harvesting of agricultural produce ? Please guide me in this case.