संदभ : आप महाराष्ट्र/२०२४/१८०६००२
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री,
विषय : १) महापारेषण ची रद्द केलेली भरतीची लवकरात लवकर सुधारित
जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकिआधी परीक्षा
घ्याव्यात.
२) महापारेषण मधील सहाय्यक अभियंता (पारेषण) पदांच्या १००%
रिक्त जागांची पद भरती करावी.
३) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील Gate परीक्षेची १०%
गुणांची जाचक अट त्वरित रद्द करावी.
४) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात
क्र.८/२०२३ JE जागा वाढ करावी आणि
५) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE साठी Open कॅटेगरी
साठी महाराष्ट्र राज्यातील निवास अनिवार्य करणे बाबत.
महोदय,
आपल्या ख्यात्याच्या अखत्यारीतील महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षेची अंदाजित तारीख ही फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते व जाहिरातीमधील नमूद पदांपैकी ८०% पदे परीक्षा झाल्यानंतर सदर जाहिरातीत अचानक १४ जून २०२४ रोजी पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे official साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालू असलेल्या प्रायव्हेट नोकऱ्या सोडून सर्व उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते.
महोदय, गरीब परिस्थितीशी संघर्ष करत असलेले नांदेड येथील सहकारी किरण रामचंद्र लांडगे यांनी महापारेषण भरती रद्द केल्यामुळे आत्महत्या केली. अशीच काहीशी मानसिक परिस्थिती महापारेषणच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांची आहे. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मध्ये GATE परीक्षेत १०% गुणांची सक्ती केली असता १३ मार्च २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण विद्युत अभियंता महाराष्ट्र यांनी आंदोलन केले असता, मा.अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग यांनी महावितरण कंपनी चे मानव संसाधन संचालक यांना GATE १०% गुणांची जाचक अट रद्द करण्यास सांगून देखील महावितरण प्रशासन एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्र मधील हजारो विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय करत आहेत अशी सर्व उमेदवारांची भावना झाली आहे. महावितरण मध्ये AE साठी ६००+ आणि JE साठी ३००+ जागा रिक्त असता AE २८१ आणि JE ५१ अश्या तुटपुंज्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने असंख्य उच्च शिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय होत आहे. १००% रिक्त पदांची भरती करण्यात यावी हि विनंती. तसेच, महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE मध्ये खुल्या वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास अनिवार्य न केल्यामुळे राज्यातील स्थानिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना आहे. राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये ऊर्जा विभाग प्रशासन विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि राज्यातील लाखो बेरोजगार तरुण तरुणींच्या वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AbhijitKaran25@ashish_jadhao@TulsidasBhoite@ameytirodkar@kamleshsutar
#गृहमंत्री_फडणवीस आणि #ऊर्जामंत्री_फडणवीस :- विरोधाभास
गृहमंत्री यांचा गृहविभाग भर पावसाळ्यात पोलिस भरतीची मैदानी चाचणी घेत आहे.
दुसरीकडे ऊर्जामंत्री यांच्या महापारेषणने केवळ SEBC आरक्षण लागू करण्याचं कारण सांगुन थेट नोकरभरती जाहिरातच रद्द केली आहे. @Dev_Fadnavis
ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील लाखो बेरीजगार तरुण तरुणींचे “खलनायक” आहेत.
संधिसाधू “महायुती” सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करुन तरुण तरुणी अद्दल घडवतील.
@Dev_Fadnavis@AAPMaharashtra@Mpsc_Andolan @degree_holders @TulsidasBhoite@waglenikhil
@abpmajhatv प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक आहे. विधानसभा निवणुकीमध्ये हा आक्रोश उग्र होणार हे स्पष्ट आहे. लवकरात लवकर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा. @Dev_Fadnavis@MSEDCL@Mahatranscoltd
@abpmajhatv महापारेशन भरती रद्द करून तरुणाचे प्राण घेणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार. जर नवीन जाहिरात काढून लवकर भरती न केल्यास विधानसभेला मात्र बीजेपी विरुद्ध प्रचार नक्की.
How can anyone be so cruel to the student's of maharastra? Instead of studying we are involving in all this. Is this you all are doing for the youngsters to get their job their right.
Is this the future ?
#Revise_Mahatrasco_Notification@CMOMaharashtra, @Dev_Fadnavis
महापारेषण आणि महावितरण मधील अधिकारी यांवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
• Mahatrasco पदभरती 2023 ही SEBC रिझर्व्हेशन मुळे रद्द करण्याचे निर्णय झाला आणि आमचे मित्र पवण रामचंद्र लांडगे यांनी आत्महत्या केली.या आत्महत्येला जबाबदार फक्त आणि फक्त ऊर्जा विभाग आहे.
ऊर्जा विभागाच्या
महापारेषण ची रद्द केलेली भरती प्रक्रिया तातडीने सूरू झालीच पाहिजे.
जून अखेर जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन झाले पाहिजे.
SEBC आरक्षणासाठी भरती रद्द करण्याचा अजब निर्णय घेणाऱ्या ऊर्जा खात्याचा धिक्कार!
@CMOMaharashtra
जुन 2023 मधे advertisement येते
ऑक्टोबर 2023 मध्ये Form भरून घेतात. मार्च 2024 मधे 80% पोष्ट ची परीक्षा घेतात, बाकीच्या Exam Postponed करतात आणि जून 2024 मध्ये पुर्ण add रद्द करतात आणि नव्याने Process चालू होते....
@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP
#Declare_mahatransco_Exam_Date
संदर्भ : आप महाराष्ट्र/१३०६२०२४/००२.
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय :- १. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील AE संवर्गाची १०% GATE गुणांची सक्ती रद्द करणे
२. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात क्र.८/२०२३ JE पदभरती मध्ये जागा वाढ करणे
३. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ साठी महाराष्ट्र अधिवास दाखला सक्तीचा करणे बाबत.
महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणांस कळवण्यात येत आहे कि, राज्यातील हजारो उमेदवारांनी ऊर्जा विभागास वरील विषय अवगत करून देण्यासाठी वारंवार लेखी पत्र व्यवहार केला आहे. ११ मार्च, २०२४ रोजी आझाद मैदान येथे राज्यभरातील शेकडो उमेदवारांनी आंदोलन देखील केले होते. GATE ही परीक्षा पदव्योत्तर शिक्षण ME/MTech प्रवेशासाठी असते. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची इच्छा नसणारे तरुण तरुणी या परीक्षेस बसत नाहीत. भरती प्रक्रियेत GATE परीक्षेबाबत महावितरणने उमेदवारांना पूर्वसूचना न देता अचानक GATE परीक्षेचे गुण अनिवार्य केले आहेत. बहुसंख्य उमेदवारांनी GATE परीक्षा न दिल्यामुळे १०% गुण अनुसार GATE परीक्षा न दिलेले उमेदवार, भरती परिक्षेअगोदरच १५ गुणांनी मागे पडले आहेत. हि गोष्ट विद्यार्थ्यांसोबतच्या मंत्रालयातील बैठकीदरम्यान मा. अप्पर मुख्य सचिव, ऊर्जा यांनी मान्य करून महावितरणचे मा. मानव संसाधन संचालक यांना त्यांनी प्रत्यक्ष फोन करून योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. ऊर्जा विभागात अंतर्गत असलेल्या महाट्रांस्को आणि महानिर्मिती विभागसुध्दा १००% हि परीक्षा घेणाऱ्या IBPS संस्थेच्या गुणांवर AE या पदाची निवड करते. महावितरण मधील AE पदासाठी GATE ची १०% स्कोअर ची अट रद्द करून संपूर्ण भरती IBPS घेत असलेल्या परीक्षेतील उमेदवारांना समान संधी निर्माण करून १००% IBPS गुणांनुसार घ्यावी अशी राज्यातील लाखो तरुण तरुणींची मागणी आहे. तसेच महावितरण मध्ये AE आणि JE चे सुमारे १०००+ पद रिक्त असल्यामुळे AE २८१ आणि JE ५१ पदभरती मध्ये जागा वाढ करावी आणि AE पदासाठी सर्वच वर्गांसाठी अधिवास अनिवार्य करावा जेणेकरून महाराष्ट्रातील तरुणांना न्याय मिळेल अशी महाराष्ट्रातील लाखो विद्युत अभियंत्यांची मागणी आहे.
राज्यातील अभियंताच्या वरील मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
जुन 2023 मधे advertisement येते
ऑक्टोबर 2023 मध्ये Form भरून घेतात. मार्च 2024 मधे 80% पोष्ट ची परीक्षा घेतात, बाकीच्या Exam Postponed करतात आणि जून 2024 मध्ये पुर्ण add रद्द करतात आणि नव्याने Process चालू होते....
@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP
#Declare_mahatransco_Exam_Date
संदर्भ : आप महाराष्ट्र / १३०६२०२४/००१
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : महानिर्मिती AE/JE जाहिरात १०/२०२२ मधील प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचे आदेश देण्याबाबत.
मा. महोदय,
महानिर्मिती जाहिरात क्र. -१०/२०२२ अन्वये AE व JE यांचे निकाल दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजी लागले आहेत. त्यानंतर निवड यादीतील उमेदवारांची जॉइनिंग प्रक्रिया २९ जानेवारी, २०२४ पर्यंत पूर्ण झालेली आहे. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा मोठ्या प्रमाणत रिक्त असूनसुद्धा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची पुढील कार्यवाही आता पर्यंत करण्यात आलेली नाही अशी उमेदवारांची भावना आहे.
प्रतीक्षा यादी केव्हा जाहीर करण्यात येईल याबाबत यादीतील हजारो उमेदवार संभ्रमित अवस्थेत आहोत. हा निकाल फक्त १८ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मर्यादित असून त्यानंतर त्याची मुदत संपणार आहे. विद्यार्थ्यांकडे फक्त २ महिने शिल्लक असल्यामुळे आपणास विनंती करण्यात येत आहे कि सदरील प्रतीक्षा यादी लवकरात लवकर कार्यान्वयीत करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून उमेदवारांचा संभ्रम दूर होईल. प्रतीक्षा यादीतील प्रत्येक उमेदवार आतुरतेने जॉइनिंग बाबत वाट पाहत असून कागदपत्रे पडताळणीबाबतची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देऊन तमाम महाराष्ट्रातील विद्युत अभियंताना न्याय द्यावा नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde