महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
नोकरभरतीचा ऐतिहासिक निर्णय! गट-क पर्यंतची पदे आता 'MPSC' च्या कक्षेत; पारदर्शकतेच्या दिशेने राज्य सरकारचे मोठे पाऊल.
राज्य सरकारने 'महाराष्ट्र २०४७' व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून प्रशासकीय रचनेत जे आमूलाग्र बदल जाहीर केले आहेत, ते महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या कष्टाचा सन्मान करणारे आहेत. "किमान शासन, कमाल प्रशासन" या सूत्राला प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी गट-अ ते गट-क पर्यंतची सर्व पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार आहेत. विद्यार्थी या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
१. वशिलेबाजीला कायमचा चाप (मुलाखती रद्द): गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील पदांसाठीच्या मुलाखती पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे मुलाखतींच्या नावाखाली होणारे तथाकथित 'अर्थपूर्ण' व्यवहार आणि पक्षपाताला आता थारा उरणार नाही. केवळ लेखी परीक्षेतील गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांची निवड होणार असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा न्याय मिळाला आहे.
२. 'एक राज्य, एक परीक्षा' संकल्पनेला बळ: विविध विभागांच्या स्वतंत्र परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक शक्ती खर्ची पडत होती. आता ५५३ संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमांत सुधारणा करून भरती प्रक्रिया एकसंध (Centralized) करण्यात आली आहे. यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यापासून ते नियुक्तीपर्यंतचा कालावधी (Time-bound) कमी होणार आहे.
३. प्रशासकीय सुसूत्रता आणि सुसूत्रीकरण: आधुनिक गरजा लक्षात घेऊन कालबाह्य पदे 'मृत संवर्ग' घोषित करून, नवीन तांत्रिक कौशल्यांवर आधारित मनुष्यबळ भरतीवर भर दिला जाणार आहे. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीच्या नियमांत सुधारणा केल्यामुळे शासकीय सेवेतील कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
४. विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार: वारंवार वेगवेगळ्या जाहिरातींसाठी हजारो रुपये शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा झाल्यामुळे पारदर्शकता तर वाढेलच, पण एकाच अर्जाद्वारे अनेक संधी उपलब्ध होतील.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@SunetraA_Pawar@cbawankule@ChhaganCBhujbal@RVikhePatil@mrhasanmushrif@ChDadaPatil@girishdmahajan@NaikSpeaks@dadajibhuse@MPLodha@SanjayDRathods@samant_uday@JaykumarRawal@Jaykumar_Gore@Pankajamunde@save_atul@ShelarAshish@bharanemamaNCP@iAditiTatkare@SanjayShirsat77@PratapSarnaik@madhurimisal@MeghnaBordikar@iYogeshRKadam@mohol_murlidhar@DrSEShinde@parthajitpawar@purveshsarnaik@dhananjay_munde@RealBacchuKadu@OmRajenimbalkr@DrPritamMunde@PatilKailasB@AbhiPawarBJP@mipravindarekar@niranjandtweets@SMungantiwar@DrBhagwatKarad@degree_holders@mpsc_office
▪️भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा.
▪️स्पर्धा परीक्षार्थींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल @CMOMaharashtra चे धन्यवाद🙏
▪️आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम आणि गतिमान करण्याची गरज आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
मार्च महिना संपत आला, पण 'Combine Group B, व C 2026 ची जाहिरात कुठे आहे?
वेळापत्रकाचे पालन होणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.
विलंबामुळे वयोमर्यादेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
मा. आयोगाने तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC#Combine2026
पगार हातात २० हजार… आणि खिशात लाखाचा फोन!
(मध्यमवर्गीय दिखाव्याचं कडू वास्तव)
आजकाल एक विचित्र फॅशन पसरली आहे. खिशात महिनाअखेरीस शून्य, वाहनात पेट्रोल टाकायला पैसे नाहीत पण हातात मात्र महागड्या फोनचा चमचमीत शो, आरशासमोर सेल्फी आणि सोशल मीडियावर हवा.
हे यशाचं लक्षण नाही, ही दिशाभूल आहे.
ज्या घरात वडिलांचा शर्ट जुना झालाय, आई अजूनही तीच साडी सांभाळून नेसते त्या कष्टाच्या पैशांतून किंवा स्वतःच्या पगाराचा मोठा हिस्सा हप्त्यांत घालवून फक्त दिखावा करणं म्हणजे स्टेटस नाही… ते संवेदनाशून्यपणाचं उदाहरण आहे.
आज जो फोन लाखाचा वाटतो, तो उद्या कवडीमोल होतो. पण तेच पैसे जर शहाणपणाने गुंतवले असते, तर काही वर्षांनी त्याच पैशांनी सुरक्षित भविष्य उभं राहिलं असतं.
महागड्या कॅफेमध्ये कॉफीचा फोटो टाकणं सोपं आहे.
पण साध्या टपरीवर चहा पिऊन उरलेले पैसे वाचवणं हे खरं शहाणपण आहे.
लक्षात ठेवा,
हप्त्यांवर उभी असलेली चमक आणि फिल्टरमधून दिसणारं सौंदर्य
पहिल्याच आर्थिक वादळात कोसळतं.
ज्याचं घर कष्टावर उभं आहे,
ज्याची कमाई प्रामाणिक आहे
आणि ज्याला वडिलांच्या मेहनतीची किंमत कळते
तोच खरा “ब्रँड” असतो.
लोकांना तुमच्या फोनचा आवाज ऐकायचा नसतो,
त्यांना तुमची प्रगती ऐकायची असते.
म्हणून गॅझेट बदलण्याआधी
स्वतःची कुवत, विचार आणि भविष्य अपग्रेड करा.
हे शब्द कठोर वाटू शकतात, रागही येईल…
पण थांबून विचार केलात तर
हेच वास्तव आहे...
🔶मा. @mpsc_office
अध्यक्ष महोदय व मा.सचिव
महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
चा निकाल जाहीर करायचा आहे की नाही ????
पूर्व परीक्षा होऊन जवळपास 3 महिने होत आहेत.
सामान्य राज्यसेवा,
स्थापत्य अभियांत्रिकी,
वन सेवा
विद्युत अभियांत्रिकी सेवा
चे उमेदवार गेल्या कित्येक दिवसापासून पूर्व च्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत.
👉 @mpsc_office चे नेमकं चाललंय काय ???
🔶इकडे गेल्या 4 अधिवेशनापासून
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
एकच घोषणा करत आहेत
👉#MPSC ला आम्ही सक्षम व बळकट करू
फक्त घोषणा पण अंमलबजावणी
शून्य
🔶 आयोगाचा कारभार सुधारणे तर दूरच पहिल्यापेक्षा अधिकाधिक
ढासळत आहे हे वास्तव आहे.
तात्काळ पूर्व परीक्षा निकाल जाहीर करा
👉राज्यसेवा मुख्य परीक्षेला केवळ
55 दिवस उरले आहेत याचे भान
फक्त उमेदवारांना आहे, @mpsc_office ला मात्र नाही
👉 यासोबतच मूळ जाहिरातील नसलेल्या विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे ?????
@mpsc_office कडे मागणीपत्रक आल्या आल्या ही सेवा सुद्धा जाहिरातीत add झाली हे सुद्धा उमेदवारांना कळवण्याचे कष्ट घेतले नाही,
याला कर्तव्यात कसूर करणे म्हणतात.
आता किमान त्यांना मुख्यची तारीख तरी द्यावी ही किमान अपेक्षा.
@CMOMaharashtra@maha_governor@mieknathshinde@NANA_PATOLE@MahaDGIPR
दादा तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला, महाराष्ट्राने आज सर्वकाही गमावले, महाराष्ट्राचे हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.
भावपुर्ण श्रद्धांजली....
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@prithvrj@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच.
#PSI_एक_वर्ष_वयवाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
PSI2025 जाहिरात सरकारच्या चुकीमुळे उशीरा आली आणि सरकारच्या धोरणामुळे एजबार झाल्यामुळे फक्त दिवस जास्त झाले म्हणून माझ्या मित्राला PSIचा फॉर्म भरता आला नाही तरी तो सध्या खूप वाईट मानसिक परिस्थिती मध्ये आहे.त्याच्या जीवाला काही झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार @CMOMaharashtraराहतील.