प्रिय ऊर्जामंत्री साहेब ,
1) महावितरण साठी गेट परीक्षा रद्द करावी
2) महाराष्ट्राचे डोमासाईल कंपल्सर��� करावे
3)सर्व पदांकरिता जागा वाढ करावी
4) ज्या जुन्या विद्यार्थ्यांचे अंतिम निवड यादीत नाव आहे त्यांना जॉइनिंग द्यावी
5) iTi वरील कं��्राटी बंद करून परमनंट भरती करावी.
@Dev_Fadnavis
संदर्भ : आप महाराष्ट्र / १३०६२०२४/००१
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : महानिर्मिती AE/JE जाहिरात १०/२०२२ मधील प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचे आदेश देण्याबाबत.
मा. महोदय,
महानिर्मिती जाहिरात क्र. -१०/२०२२ अन्वये AE व JE यांचे निकाल दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजी लागले आ��ेत. त्यानंतर निवड यादीतील उमेदवारांची जॉइनिंग प्रक्रिया २९ जानेवारी, २०२४ पर्यंत पूर्ण झालेली आहे. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा मोठ्या प्रमाणत रिक्त असूनसुद्धा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची पुढील कार्यवाही आता पर्यंत करण्यात आलेली नाही अशी उमेदवारांची भावना आहे.
प्रतीक्षा यादी केव्हा जाहीर करण्यात येईल याबाबत यादीतील हजारो उमेदवार संभ्रमित अवस्थेत आहोत. हा निकाल फक्त १८ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मर्यादित असून त्यानंतर त्याची मुदत संपणार आहे. विद्यार्थ्यांकडे फक्त २ महिने शिल्लक असल्यामुळे आपणास विनंती करण्यात येत आहे कि सदरील प्रतीक्षा यादी लवकरात लवकर कार्यान्वयीत करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून उमेदवारांचा संभ्रम दूर होईल. प्रतीक्षा यादीतील प्रत्येक उमेदवार आतुरतेने जॉइनिंग बाबत वाट पाहत असून कागदपत्रे पडताळणीबाबतच�� प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देऊन तमाम महाराष्ट्रातील विद्युत अभियंताना न्याय द्याव��� नम्र विनंती.
@Dev_Fadnavis @mieknathshinde