In 2015, then Additional Chief Secretary Kulkarni reportedly wrote to the then Chief Secretary raising serious concerns regarding Johnny Joseph’s integrity, honesty and other aspects of his official conduct.
Today, the same Johnny Joseph has been appointed to head the investigation/committee into the alleged fraud in MMRDA’s recruitment process.
This raises a fundamental question: How transparent and impartial can an investigation be when serious concerns about the very person heading it have reportedly been raised in the past?
Students demand a truly independent Judicial Inquiry, preferably under the supervision of a sitting/retired High Court judge. The investigation must be completely transparent, and criminal action should be initiated against anyone found guilty, irrespective of their position.
Students deserve justice, transparency and accountability.
#MMRDA_SCAM #MMRDA #JudicialInquiry #Transparency #Accountability #StudentPower
@MMRDAOfficial@DrSanMukherjee
‘रोजगार न्याय यात्रे’तून महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज! ✊
रिक्त पदांची तातडीने भरती, प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’ काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. बी. एम. संदीप आणि AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्रीमती रेहाना क्रिस्टी यांनी पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. यात्रेत गोपाल तिवारी व अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम डोळे यांच्यासह पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिवसरात्र मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यात्रेदरम्यान सिंचन भवन येथे मुख्य अभियंता तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन युवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
@INCHarshsapkal@BMSandeepAICC@RayazRehana@atullondhe
@CongressRojgar
@PMCPune@CollectorPune #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
Thank you AAJ TAK for supporting our students but students don't believe on this "clean chit" investigation committee we want court moniterd investigation bcz these scammers have very big nd deep nexus and they leak all paper's @MMRDAOfficial@DrSanMukherjee#MMRDA_SCAM
@RRPSpeaks MMRDA, PMC, NMC आणि BMC च्या ऑनलाईन परीक्षा (TCS/IBPS द्वारे) पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर सहज मॅनेज केल्या जात आहेत. यात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव आहे. आमची मागणी आहे की गट 'ब', 'क' आणि 'ड' च्या सर्व परीक्षा MPSC किंवा एका विशेष सरकारी यंत्रणेकडे सोपवाव्यात. 🧵👇 #MPSC
@RRPSpeaks 📍 #MMRDA मध्ये ज्यांना प्रमाणापेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत त्यामधील विशेष सुरुवातीचे rankers
...त्यांचा कोणताही कसलाही अभ्यासाचा इतिहास नाही.... ना त्यांना आधीच्या परीक्षेमध्ये चांगले marks आले आहेत....
Suddenly याच परीक्षेमध्ये कसे marks वाढले तेही 190+....हे शक्यच नाही....
'पेपरफुटी आणि सावळागोंधळ' ही राज्यातील प्रत्येक भरती परीक्षेची ओळख बनली आहे. आज हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतही हाच प्रकार घडला. लॉगिन न होणे, की-बोर्ड बंद असणे आणि टायपिंग सॉफ्टवेअर न चालणे या तांत्रिक त्रुटींसह पेपरफुटीमुळे राज्यात विविध ठिकाणी संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ही सदोष परीक्षा तातडीने रद्द करून फेरपरीक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
#पेपरफुटी
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
दुसऱ्या दिवशीही PMC समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
गंभीर पुरावे समोर आहेत.तरीही प्रशासन मौन बाळगून आहे.हे आंदोलन थांबणार नाही, जोपर्यंत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही.
विद्यार्थ्यांचा संयम संपत चालला आहे. आता मौन नाही, निर्णय हवा!
@prajytnair@navalMH
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
मा. विवेक भीमनवार जी,
ऑफलाईन परीक्षांचे निकालही पारदर्शक आणि जलद पद्धतीने जाहीर करता येतात, हे आयोगाने वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे केवळ वेगाच्या नावाखाली उमेदवारांवर ऑनलाईन परीक्षेचा तुघलकी निर्णय लादू नये, ही नम्र विनंती.
उमेदवारांचा विश्वास, पारदर्शकता आणि परीक्षेची विश्वासार्हता यांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांशी संवाद साधूनच पुढील निर्णय घ्यावेत.
@bhimanwar
#MpscOfflineExam
PMC-JE भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून व्यक्त होत असलेल्या शंका आणि आक्षेप गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली असताना Normalization प्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात आली, Raw Score व Normalized Score सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, तसेच गुणवत्तायादी आणि गुणांकनाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे का जाहीर करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निकालातील कथित विसंगतींमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व गुण, सेक्शननिहाय माहिती आणि Normalization संदर्भातील तपशील जाहीर करणे आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर काही संशयास्पद बाबी देखील समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. मेरिट यादीतील अव्वल उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि संबंधित अहवालांची पडताळणी करून सत्य जनतेसमोर आणावे.
राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना द्यावा. पात्र आणि मेहनती उमेदवारांना न्याय मिळणे हीच सर्वांची अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMCPune
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीच्या निकालाबाबत अनेक उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत उमेदवारांनी स्वतः पुढाकार घेऊन मनपा प्रशासनाकडे जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, संस्था आणि संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
@satejp@VijayWadettiwar@INCHarshsapkal@PMCPune@degree_holders@PunyachiMPSC
#PMC_JE #JusticeForCandidates #StudentsFirst #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
@PatilKailasB@prajytnair आता काय बोलणे आहे आपले
Genuine magani आहे ही.
आम्ही IBPS la STD FORMAT RESULT Sathi
Complaint takali hoti
Tyancha kadun reply ala ki
PMC la contact kara
Ata PMC ne IBPS company ne
Dilela STD format result dya
With all details, shift wise chart etc.
PMC-JE परीक्षेत घोटाळ्याचा संशय; सत्य बाहेर आणा..
पुणे महानगरपालिकेच्या PMC-JE परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेले गंभीर आक्षेप अत्यंत चिंताजनक आहेत. परीक्षा सात शिफ्टमध्ये घेण्यात आली असताना Normalization प्रक्रिया कशी राबविण्यात आली, Raw Score आणि Normalized Score जाहीर का करण्यात आले नाहीत, तसेच IBPS पद्धतीप्रमाणे पारदर्शक निकाल का प्रसिद्ध करण्यात आला नाही..
परीक्षेच्या निकालात अनेक विसंगती असून सात शिफ्टमध्ये परीक्षा होऊनही गुणांकन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. गुणवत्ता यादी, सेक्शननिहाय गुण, Raw Score आणि Normalized Score जाहीर केल्यास सत्य समोर येईल..
याशिवाय, परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची शक्यता दर्शविणारे काही पुरावे समाजमाध्यमांवर समोर आले आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखे आहे..
यापूर्वी जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेतही संशय निर्माण झाल्यानंतर CCTV फुटेज, उमेदवारांच्या हालचाली आणि गोपनीय अहवालाच्या आधारे चौकशी करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर PMC-JE प्रकरणातही मेरिटमधील अव्वल ३०० उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि गोपनीय अहवाल तपासून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी..
राज्य सरकारने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही विनंती..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune