मृद व जलसंधारण तसेच अभियांत्रीकी सेवेच्या मुलाखती व एसएससी जीडी परीक्षा पुढे ढकलावी..!
राज्यात शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा या 20 व 21 फेब्रुवारी रोजी शासनाने घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे विविध जिल्हयात वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रवासात आडथळा निर्माण होवून परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येणार नाही त्यामुळे या उमेदवारांना परीक्षा व मुलाखती पासून वंचीत राहण्याच्या भितीने हजारो उमेदवार या परीक्षा व मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.
तसेच दिवसेंदिवस खाजगी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार वाढत असून सध्या नियोजीत केलेल्या परीक्षा या खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्याचे शासनाने निश्चीत केले आहे तरी या परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात अशी देखील तशी देखील उमेदवारांकडून मागणी होत आहे त्यामुळे शासनाने या दोन्ही मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा या उमेदवारांवर होणारा अन्याय दुर करणे बाबत आपण शासन स्तरावर योग्य ते निर्णय घ्यावेत, ही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे कडे केली आज आहे.
#भरती #अभियांत्रिकी #एसएससीजीडी
@mieknathshinde
हे सेंटर बीड येथील आहे. सर्वच खाजगी सेंटर असे आहेत. लगेच हे मॅनेज होतात. याबाबतीत लातूर येथे सेंटर मालक वर गुन्हा दाखल झाला आहे. खाजगी सेंटर देताना कोणतेही निकष दिले गेले नाहीये. त्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत.@SanjayDRathods@atullondhe @Dhananjay_AAP @BaliramDoley
#TCSion_centre#WCD_670
संदर्भ : आप महाराष्ट्र / १८०२२०२४/००१
प्रति,
मा. संजय राठोड,
मृद व जलसंधारण मंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय:- मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या अधिकृत केंद्रावरच परीक्षा घेण्याबाबत.
संदर्भ: मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२३.
महोदय,
मृद व जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात २३ डिसेंबर, २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. हि परीक्षा पुढील आठवड्यात मंगळवार दि. २० फेब्रुवारी आणि बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील, TCS ION चे अधिकृत केंद्र न देता खासगी केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या खाजगी केंद्रांवर या अगोदर पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. दोषमुक्त परीक्षा घेण्याची व्यवस्था या खाजगी केंद्रांकडे नाही असे गेल्या अनेक परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून आढळून आले आहे. एकीकडे रु. १०००/- फी भरून आणि अनेक वर्षे परीक्षेची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर वर परीक्षा घेणं हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो उमेदवारांवर मोठा अन्याय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विध्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी असून हा निर्णय प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" करणाराआहे.
जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या खासगी केंद्रांमुळे या परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आपण सदर पदभरती परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या केंद्रावरच परीक्षा आयोजित करून प्रामाणिक युवक युवतींना दिलासा द्यावा.
धन्यवाद,
@sanjaydrathods@mieknathshinde@SandeepPathak04
#UPP_Exam #UPP_Paper_Leak
मृद व जलसंधारण WCD) गट ब पदाच्या पारदर्शक भरतीसाठी आदर्श सेंटर बघा...
अशा केंद्रावर परीक्षा होणार असतील तर अभ्यास करणाऱ्या पोरांनी सरळसेवा परीक्षांचा अभ्यास बंद करावा
इथल्या बोगस केंद्रावर सर्व जागा कॉपी करण्यासाठी आधीच विकल्या असतील तर दाद मागायची कोणाकडे?
कुंपणच शेत खातंय?
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods@CMOMaharashtra
तलाठी भरती, वनरक्षक भरती चे अनुभव असून देखील जर तेच तेच सेंटर दिले असतील तर खरंच विद्यार्थ्यांवर अन्याय्य आहे.@SanjayDRathods 670 पदे म्हंजे खूप मोठी जाहिरात आहे एकदा विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करावा. @Dhananjay_AAP @BaliramDoley @Mpsc_Andolan#WCD_670
TCS/IBPS कंपन्यांना आम्ही इशारा देतोय, तुमच्या मॅनेज परीक्षा केंद्रांचा घोटाळा इतक्यातच आम्ही बाहेर काढला आहे. फोटोत दिसणारे थर्ड क्लास परीक्षा केंद्रे देऊन आमचे भविष्य नासवू नका. यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा फक्त TCS ION अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाल्या पाहिजेत, जर शासनाने किंवा कंपन्यांनी आमची मागणी मान्य केली नाही तर TCS/IBPS या कंपन्यांचे कंत्राट काढून घेण्यात यावे, यासाठी मोठी चळवळ उभी केली जाईल. येत्या जलसंधारण विभागाची परीक्षा फक्त Ion केंद्रावर झाली पाहिजे, तोपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक पुढं ढकलण्यात यावं.
@TCS@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RRPSpeaks@AUThackeray .
मा. संजय भाऊ,
खाजगी परीक्षा केंद्रे पेपरफुटी चा अड्डा झाल्याचे अनेक पुरावे या अगोदर झालेल्या सर्व परिक्षांमधील पेपरफुटी मुळे विद्यार्थ्यांसमोर आले आहेत.
लातूर आणि धाराशिव मधील
खाजगी परीक्षा केंद्रांमध्ये झालेल्या पेपर फुटिमुळे संबंधितांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत.
गल्ली बोळात असलेले परीक्षा केंद्र निवडताना शासनाने कोणते निकष वापरले आहेत याची चौकशी करून आपण स्वतः जर या केंद्राला भेट दिली तर आपणांस धक्का बसेल.
कृपया आपण यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना "न्याय" द्यावा ही विनंती.
@SanjayDRathods@Mpsc_Andolan@MarathiBrain@MarathiRojgar@AAPMaharashtra
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods@CMOMaharashtra
#तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठी पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते? TCS ION केंद्रांवर परिक्षा घेण्याचे निर्देश संबंधित कंपनीला का दिले जात नाहीत? राज्यसरकार याबाबतीत कधी #serious होणार आहे की नाही?
#परीक्षांच्या संदर्भातील एवढ्या महत्वाच्या विषयावर सरकारची व नेत्यांची भूमिका बघता विद्यार्थ्यांना स्वतःच हा लढा लढावा लागणार आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत कुणी असो वा नसो; परंतु मी मात्र नेहमी सोबत आहे!
#पेपरफुटी
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#WCD Exam Update
एवढीच Exam घ्यायची घाई झाली असेल तर ते 66 Centre पण कळू द्या जगाला किती बोगस आणि निकृष्ट दर्जाचे Centre आहेत विद्यार्थ्यानंकडून एवढी फी घेता तरी कशासाठी मग???
@sanjayrathod@CMOMaharashtra
#WCDWCO
जलसंधारण अधिकारी गट-ब पदाची परीक्षा 20 व 21 फेब्रुवारी रोजी होत आहे 50000+उमेदवार परीक्षा देणार आहेत.या परीक्षेत ज्या सेंटरची चौकशी चालू आहे असे सेंटर दिले आहे
परीक्षा पुढे ढकलावी, परिक्षा #TCSion डिजिटल सेंटरवरच घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे @mieknathshinde
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे सेंटर दिले आहेत. निकृष्ट दर्जाचे केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील अधिकृत सेंटर न देता खासगी सेन्टरवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.. एकीकडे १००० रुपये फी भरून तसेच चार-पाच वर्षे भरतीची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर मिळत असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जलसंधारण अधिकारी गट ब ही अत्यंत महत्त्वाची पोस्ट असून त्यासाठी दिले जाणारे खासगी सेन्टर यामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य सरकारला माझी विनंती आहे की, आपण सदर परीक्षा पुढे ढकलून TCS ION च्या अधिकृत सेंटर वर परीक्षा आयोजित करावी..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@Mpsc_Andolan@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#WCD
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका.
@CMOMaharashtra@SanjayDRathods