@maha_governor Thousands of honest aspirants spent years studying, only for the PMC Junior Engineer(Civil) exam to be ruined by hightech cheating and leaks. Justice delayed is justice denied! Honorable @maha_governor,please intervene cancel the exam & order a re-test immediately
#CancelPMCExam
@maha_governor#PMC_JE_Scam But regarding normalization—the three individuals who were caught could potentially be the toppers of that specific shift; this will have a massive impact on the normalization process. Please conduct a re-examination.
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गैरप्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या न���दर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्यामुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण करणार? आणि ���ोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे ��हापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्रसंगी शिवसेनेकडे उपलब्ध असलेले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune @pmccarepune @PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
@navalMH अभ्यासिकेत दिवस अन् ढेकणात रात्र काढली
कधी वडापाव मॅगीवर भूक भागवली
कधी परीक्षेच्या तारखा पाहून
कित्येक दसरा अन् दिवाळी
घर���ची पायरी नाही चढली
अन् AC त बसून पेपर फोडणाऱ्यांनी
पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.
#PMC RE EXAM
#JUSTICS
@RRPSpeaks पेपर कोणाला मिळाला नाही, पेपरफुटीचा प्रकार झाल्याचा निर्वाळा महापालिकेने दिलेला नाही. ही वैयक्तिक स्तरावर केलीली CopyCaseआहे. इतर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे चौकशी केली आहे, तर वयक्तिक रित्या केलेल्या गैरप्रकाराची शिक्षा प्रामाणिक निवड झालेल्या विद्यार्थ्यांना का दिली जावी?
@RRPSpeaks रात्रीच्या अंधारात नियुक्तीचे पत्र काढणे म्हणजे पारदर्शकतेचा बोजवारा आणि प्रशासनाचा सहभाग स्पष्ट संकेत देतो!
PMC JE भरतीतील घोळाची तक्रार झाल्या��र केवळ ५ जणांना न्याय देऊन बाकीच्यांचे बळजबरीने बडतर्फ पत्र काढणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत का? हा कसला न्याय?