#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
Assistant Engineer परीक्षेसाठी GATE ची अट रद्द करून नेहमीप्रमाणे 150 मार्क्स चा पेपर घ्याव्यात आणि जागा वाढवुन महाराष्ट्र मधील सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#NO_GATE_FOR_Mahadiscom#Increase_AE_JE_Vacancy
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०५०१२०२४/००१.
प्रति,
मा. लोकेश चंद्र जी,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
महाराष्ट्र राज्य
विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या.
संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE)
महोदय,
आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.
अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला सोमवार दिनांक ८ जानेवारी किंवा मंगळवार दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी वेळ द्यावी हि विनंती.
धन्यवाद,
#Increase_AE_JE_Vacancy #No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
@mieknathshinde@Dev_Fadanvis@MSEDCL@CMDMSEDCL@SandeepPathak04@AjitPawarspeaks@maha_governor
Assistant Engineer परीक्षेसाठी GATE ची अट रद्द करून नेहमीप्रमाणे 150 मार्क्स चा पेपर घ्याव्यात आणि JE च्या जागा वाढवुन महाराष्ट्र मधील सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#NO_GATE_FOR_Mahadiscom#increase_JE_vacancy
प्रति,
मा. एकनाथ शिंदे जी,
मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री,
महाराष्ट्र राज्य.
विषय :- नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालय आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण सेवा श्रेणी-१ गट ब / राजपत्रित या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविणेबाबत दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना व मुल्यनिर्धारण सेवा श्रेणी-१ गट ब / राजपत्रित या पदासाठी शेवटची जाहिरात जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेली याला २ वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. यापूर्वी कोरोना कालावधी मध्ये परिक्षा न झालेले विद्यार्थ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच अजुन पुढील पदभरती जाहिरात येईपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य स्थितीत RTI नुसार मिळालेल्या माहितीनुसार १६७+ पदांची जाहिरात अपेक्षित आहे, त्यामुळे सदर प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घालून नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालय व नगर विकास विभाग यांना मागणी पत्रा बाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना पाठविण्याचे आदेश द्यावेत, हि नम्र विनंती.
@mieknathshinde@CMOMaharashtra@AamAadmiParty
#Increase_Vacancy_2023
#महाराष्ट्र #Maharashtra