मा. @Tukaram_IndIAS सर,
MPSC पेपरफुटी संदर्भात सुरू असलेल्या चौकशीची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही व निष्कर्ष याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करावी.
आयोगाच्या कामकाजाबाबत पारदर्शकता राहण्यासाठी उपलब्ध माहिती लवकरात लवकर जाहीर होणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra@MahaDGIPR
गट- क च्या १६,७१७ पदांचा गाजावाजा करता, मग इतर विभागांतील रिक्त पदांचा आकडा जाहीर करायला सरकारला लकवा मारलाय का?
शिक्षण, आरोग्य, गृह, कृषी, महसूल अशा प्रत्येक विभागातील लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या रिक्त पदांचा हिशेब द्यायला सरकार तयार का नाही?
निवडक पदांची घोषणा करून बेरोजगार तरुणांच्या डोळ्यांत धूळफेक करू नका! प्रत्येक विभागातील मंजूर, भरलेली आणि रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करा. किती पदे रिक्त आहेत आणि ती कधी भरणार, याचे उत्तर द्या!
तरुणांना जाहिरातींचे गाजर नको, नोकऱ्या हव्यात!
@INCHarshsapkal@satejp@vishwajeetkadam@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
MPSC च्या पेपरफुटीचे पुरावे देताना सोबत शपथपत्र बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाहक भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं पुरावे देताना विद्यार्थ्यांसाठी शपथपत्राच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याची मागणी न्यायिक चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं केली आणि याबाबतचं पत्रंही त्यांना दिलं. तसंच पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पुणे शहरात सुनावणी घेण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीही त्यांना केली.
एकीकडे विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करायचे, पालकांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहायची; तर दुसरीकडे प्रशासकीय गैरकारभार आणि भ्रष्ट नेत्यांनी ही स्वप्न धुळीस मिळवायची. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक अत्यंत गंभीर घोटाळा स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शोधला आहे.
शिक्षणाचा मांडलेला हा बाजार पत्रकार परिषदेतून समोर आणणार असून, अतिशय गंभीर असलेल्या या प्रकरणामुळे एका मोठ्या मंत्र्यालाही राजीनामा द्यावा लागू शकतो. भेटूया उद्या, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे, संध्याकाळी ४ वाजता!
@EA_OfficialMH "केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस! प्रत्यक्षात जाहिरात कधी निघणार? तरुणांचा टणाव आणि नैराश्य सरकारला दिसत नाही का? लवकरात लवकर आरोग्य भरतीची जाहिरात काढा.
#आरोग्यभरतीजाहिरात#आरोग्यभरती"
@EA_OfficialMH "केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस! प्रत्यक्षात जाहिरात कधी निघणार? तरुणांचा टणाव आणि नैराश्य सरकारला दिसत नाही का? लवकरात लवकर आरोग्य भरतीची जाहिरात काढा.
#आरोग्यभरतीजाहिरात#आरोग्यभरती"
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती करण्याचे मोठे दावे सरकारने केले होते!
परंतु, बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आले तरीसुद्धा आरोग्य भरतीची कोणतीही अधिकृत जाहिरात आलेली नाही!
आरोग्यमंत्र्यांची ही केवळ पोकळ आश्वासने ठरली असून, राज्यातील लाखो बेरोजगार तरुण या प्रतीक्षेत तीव्र मानसिक तणाव व नैराश्यात जगत आहेत. सरकारने ही फसवणूक तातडीने थांबवून तात्काळ आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी!
#आरोग्यभरतीजाहिरात
#आरोग्यभरती #EknathShinde #PrakashAbitkar
@iprakashabitkar@iprakashabitkar@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde