तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिक��री असे अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
फडणवीस-शिंदे-पवार सरकारने एकदाचे सर्व निर्णय घेऊन टाकावे, अवघे काही महिने शिल्लक आहेत या सरकारचे. पुढील निवडणुकीत आपल्याला आमच्याकडे मते मागायला यावंच लागेल, तेव्हा राज्यातील तरुण निर्णय घेईल.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?
बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतय.
10 लाखात तलाठी पद विकले जात आहे. वनरक���षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत.
युवकांचे भविष्य असे आम्ही विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे,दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
याचा कर्ता करविता कोण आहे?
#तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुट��्याचा बात���्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग #seriuous झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
.@Dev_Fadnavis साहेब तलाठी चा पेपर आज पासून सुरू झाले. सकाळची पहिलीच शिफ्ट आणि पेपर फुटून बाहेर आलेच. बाहेर फिरणाऱ्या मुलांच्या मोबाईल मध्ये पेपर सापडला. म्हणजे पेपर हा फुटलाच ना.आता प्रश्न पडतोय की त्या���ा कोणी पाठवला. अजून किती जनापर्यंत हा पेपर गेला असेल. आपण राजीनामा द्या आता.
#पदभरतीसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे फक्त इतकी ओळ टाकून नेहमीचा संभ्रम निर्माण केला जात आहे
सगळ्या विभागांसाठी एकच शुल्क? एखाद्या विभागातील पदांसाठी एकच शुल्क? नेमका काय निर्णय सरकारने घेतला आहे तो उलगडून सांगण्यात यावा ही नम्र वि���ंती.
@Dev_Fadnavis @RRPSpeaks @CMOMaharashtra
संसद टिव्ही ने इतका भेदभाव करावा..
राहुल गांधी बोलताना दहा सेकंद पण दाखवलं नाही आणि स्मृती इराणी यांना मात्र संपूर्ण दाखवत आहे..सगळे हावभाव हातवारे दाखवत आहे..
पण राहुल गांधी मुळीच दाखवलं नाही
धिक्कार
विरोधकांना दाखवायचे नाही...आवाज दाबायचा...लोकशाहीची हत्या हीच आहे
आज सर्वात कमाल लोकसभा टीव्हीच्या कॅमेरा स्विचरने केली आहे
जेव्हा जेव्हा विरोधी पक्षाचा नेता बोलतो तेव्हा बोलणाऱ्याच्या आवेशापेक्षा लोकसभा अध्यक्षांचे सुस्त चेहरे दाखवत राहतात.
सत्ताधारी पक्षाचं कोणी बोलत असताना मात्र असं होत नाही.
इतका कद्रूपणा वाढला आपल्या संसदीय परंपरेत?
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्��ा खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसु��्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
स्पर्धा परीक्षेतील भर��साठ शुल्कवाढी विरोधात आज प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन पक्षातर्फे अकोला येते आंदोलन करण्यात आले.वंचितने अनेक दिवसांनंतर आमच्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. वंचित सोबत इतर पक्षांना आवाहन पेपरफुटी आणि शुल्कवाढीबाबत गरिबांना न्याय मिळवून द्यावा
मा. देवेंद्र जी,
रु. १०००/- या परीक्षेच्या शुल्काचे समर्थन करणारे आपले वक्तव्य अर्धवट, सभागृहाची व जनतेची दिशाभूल करणारे आहे. तुमचं लॉजिक तपासायची वेळ आलीय!
परीक्षेची तयारी करणारे सर्वच विद्यार्थी लाखो रुपये शुल्क भरून खा��गी क्लासेसला जाणारे नसतात
@AAPMaharashtra
@Dev_Fadnavis
फडणवीसजी आमदाराच्या घरात जन्माला यायला यायला सर्वा��चे नशीब आपल्यासारखे नसते, वर्ग-३/४ च्या नोकऱ्यांमध्ये अर्ज करणारे गरीब घरचे आहेत.
सीरियस उमेदवारांनी अर्ज करायला पाहिजे म्हणून १००० फीस हे कुठले लॉजिक? UPSC,MPSC, १०० रुपयांपासून शुल्क घेतात म्हणजे तिथं नॉन-सीरियस अर्ज करतात का?
अस कस चालेल फडणवीस साहेब ! आपण सत्तेत असताना परीक्षार्थी गरीब होते व आपण सत्तेत येताच ते श्रीमंत झाले का?
कृपया दुहेरी भूमिका न मांडता मानसिक तणाव झेलत,एक वेळ उपाशी राहून अभ्यासिकेत बसून बेरोजगार दिवस काढतात,आपण त्यांना दिलासा द्यावा🙏
#Exam_Fee@Dev_Fadnavis@SMungantiwar
विविध परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना,शासकीय नोकरी लावायचे आमिष दाखवून पैसे घेतल्याने अटक
पेपरफुटी,नोकरभरती घोटाळ्यात मंत्रालयातील कित्येक अधिकाऱ्यांना अटक झाली पण ते परत रुजू होतात.म्हणून #पेपरफुटीवर कायदा करण्याची गरज निर्माण झाली आहे
फक्त सहानुभूतीच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाही, गरीब-वंचितांचे-बेरोजगारांचे प्रश्न तुम्ही मांडू शकत नसाल तर पुढील निवडणुका तुमच्यासाठी मैलाचा दगड असेल. महाराष्ट्रातील पेपरफुटीवर आता तरी बोलाल अशी अपेक्षा.
@AUThackeray@ShivSenaUBT_@SaamanaOnline@AGSawant@OfficeofUT