टीईटी,सिटीईटी,अभियोग्यता यांसारख्या कठीण चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यावरही जर चार वर्षापर्यंत थांबावे लागत असेल आणि बीएमसी या 252 मुलांना डावलून 800 पात्रता पूर्ण न करणाऱ्या मुलांना कामावर घेणार असेल तर प्रगत महाराष्ट्रासाठी व व्यवस्थेसाठी अतिशय दुर्दैवी अन लाजिरवाणी बाब आहे.
मराठी अस्मिता कुठे गायब झाली हेच या बिचाऱ्या 102+150 मुलांना समजत नाहीये....आणि भयाण वास्तव हे आहे की तब्बल 200 + दिवस आझाद मैदानावर आंदोलन करूनही पुरोगामी महाराष्ट्रात याची दखल घेतली जात नाही.....???
देव दिसलेच आहेत तर जरा त्या १५० शिक्षकांना पण देवाची इच्छा समजून सहकार्य करा...... मराठीतून शिक्षण घेणाऱ्यांना तर भिकेला लावलेच आहेत, किमान ह्या १५० शिक्षकांना तरी नोकरी द्या..... पगार तुम्हाला खिशातून नाही द्यायचा, पण तुम्हाला मत हेच देणार.... ध्यानात असू द्या.....
@AUThackeray मराठीचे किती बेगडी प्रेम आहे हे समजलं...... मराठी मराठी म्हणून गळे काढायचे आणि दुसरीकडे मराठी माध्यमातून शिकलेल्या शिक्षकांना हाकलून लावायचे.......... बंद करा असे दुटप्पी वागणे...... मराठीची थोडी जरी चाड उरली असेल तर १५० बिचार्या शिक्षकांना रुजू करून न्याय द्या,पाट थोपटतो तुमची