महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते.
महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
वीज कंपनीतील सर्व रिक्त जागा भराव्यात व महाराष्ट्र राज्यात निवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा.
@AAPMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@iambadasdanve@VijayWadettiwar
#No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
#Increase_AE_JE_Vacancy
#Dhananjay_Shinde
#राज्यसेवा2024जागावाढ
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात येणार म्हणून 2 वर्षापासून गाजर दाखविले जात आहे.उमेदवारांचे वय निघून जात आहे परंतु जाहिराती चा काही पत्ता नाही.कधी प्रसिद्ध होणार जाहिरात?
#BMC_SE_JE@CMOMaharashtra@mieknathshinde@mybmc@IqbalSinghChah2