@BaliramDoleyINC २०२२ पासून सर्व ग्रुप अबक ची फॉरेनसिक चौकशी हवी आहे..आणी सध्याची mpsc बॉडी सर्व बरखास्त करून ग्रुप क चा नवीन पेपर सेट करून on time पेपर हवा
@BaliramDoleyINC दादा , तुम्ही आणि रोहित पवारकडूनच अपेक्षा आहे... बाकीच्या राजकारण्यांना ना mpsc मधलं काही समजत ना त्यांची प्रामाणिक इच्छा...
MPSC लागलेली भ्रष्टाचाराची कीड
ऑनलाईन परीक्षेचे फर्मान
एक उमेदवार एक पद (पसंतीक्रम)
हे मुद्दे लावून धरा.🙏
@BaliramDoleyINC पदवीधर आमदार काय सगळे मेले काय.. पदवीधर नी निवडूण दिल n ata कुठे गेले काय करता पदवीधर साठी नुसते मलिदा खाता काय तुमच्या तोंडातून ऐक शब्द बाहेर येतं नहीं... सतीश चव्हाण कूठे आता सगळे गप्प बसले आता.. पदवीधर आमदार पद्धत बंद केली पाहिजे.
@BaliramDoleyINC अध्यक्ष आणि सचिवाचा राजीनामा तर झालाच पाहिजे, पण पूर्ण टीम पण बरखास्त करा. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी तिकडे बसवा. मंत्रालयातील माणसं आयोगात नका पाठवू.
@BaliramDoleyINC@bhimanwar
👉नैतिकतेचे सर्वोच्च प्रतीक असलेले स्व. श्री. लालबहादूर शास्त्री यांनी १९५६ मध्ये झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
“मी रेल्वे चालवत नव्हतो,” असे कारण त्यांनी दिले नाही.
सदसद् "विवेकबुद्धी" व "नैतिकता" गहाण ठेवलेल्या #MPSC अध्यक्षांवर बोलू काही...
👉संवैधानिक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदाचा कार्यभार स्वीकारताना पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती. विसरलात काय,
👉तीच “गोपनीयता”, जिचे ऋषिकेश गांगुर्डे यांनी निडरपणे वाभाडे काढले आणि संपूर्ण देशभर पेपरफुटीमुळे #MPSC ची नाचक्की झाली व इज्जतीचे धिंडवडे वेशीवर टांगले गेले.
यावर आपण “अविवेकी” विचार करून बालिश कारणे देण्याचा “भीम” पराक्रम करत आहात. त्यावर मी एकच बोलतो
👉“तू इधर-उधर की न बात कर, ये बता कि काफिला क्यों लुटा;
👉आपल्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षकाचा पेपर जानेवारीत फुटला होता; त्यावेळी मी अध्यक्ष नव्हतो.
मग या प्रश्नांची उत्तरे द्या.
१) पेपरफुटी जानेवारीपासून मार्चपर्यंत सुरू होती का?
२) नेमका पेपर किती वेळा फुटला?
३) किती जणांनी फोडला?
४) किती जणांसाठी फोडला?
जर खरंच पेपर जानेवारीत फुटला होता व आपणास त्याची कल्पना नव्हती, हे सत्य असेल तर तत्कालीन अध्यक्ष श्री. अभय वाघ ( प्रभारी )यांच्यावर अद्याप आपण कारवाई का केली नाही?
त्यांना या प्रकरणात सहआरोपी का केले नाही?
किंवा अगदीच काही नाही, तर किमान जबाबदारी स्वीकारून वाघ यांना राजीनामा देण्यास का सांगितले नाही?
👉सर्वात महत्त्वाचे...
आपण यापूर्वी शासन सेवेत भ्रष्टाचार केला किंवा नाही, यानंतर काय करणार,यापेक्षा पेपरफुटीनंतर पदाला चिकटून राहण्याची प्रवृत्ती व दुसऱ्यावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसतोय.
👉आपण ना खुर्ची सोडत आहात, ना सोडायला लावत आहात.
आपण खरंच “निरपराध” असाल, तर लक्षपूर्वक वाचा,
“नैतिक जबाबदारी”
लोकशाहीमध्ये “नैतिकता” हा सुशासनाचा कणा असतो.एखादी दुर्घटना घडते किंवा मोठे प्रशासकीय अपयश येते, तेव्हा संबंधिताने स्वतःला जबाबदार धरणे व पदत्याग करणे हेच उच्च राजकीय/प्रशासकीय नैतिकतेचे लक्षण असते.
मग वैयक्तिक दोष असो वा नसो.
👉नैतिकतेचे सर्वोच्च प्रतीक असलेले स्व. श्री. लालबहादूर शास्त्री यांनी १९५६ मध्ये झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
“मी रेल्वे चालवत नव्हतो,” असे कारण त्यांनी दिले नाही.
👉पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी व उत्तरदायित्व कुणाचे आहे?
👉आपण राजीनामा देणार / हकालपट्टी होणार?
की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्हालाच कठोर पावले उचलावी लागणार?
हे येणारा काळ ठरवेल.
👉जाता जाता
नैतिक जबाबदारीने दिलेला राजीनामा हा केवळ राजकीय किंवा प्रशासकीय बदल नसून, व्यवस्था अजूनही संवेदनशील असल्याची जनतेला खात्री देणे होणे
राजीनामा देणे म्हणजे पळपुटेपणा नव्हे, तर लोकशाही प्रणालीवरील विश्वास दृढ ठेवण्याचे साधन आहे.
त्यामुळे निरपराध असाल / नसाल,“विश्वासार्हता गमावलेली असल्याने तात्काळ निर्णय घ्या.
तूर्तास इतकंच, बाकी उद्या.......
@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@mpsc_office@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar
@BaliramDoleyINC@Dev_Fadnavis काय बिघडतं नाही राजकीय लोक आले तरी यांना निवडून का देतो प्रश्न विचारण्यासाठी च ना.माग यांनी नाही विचारायचे तर कोण विचारणार..सतेतल्यांना आवाहन करतो तुम्ही पण या आमच्यात आहे का हिम्मत ..कोण येतो कोण नाही हे नाका बघू केलेली घाण साफ करा तुम्ही..माग बोला राजकारण गेल खड्यात तुमचं