@satejp "धन्यवाद महोदय! गेल्या ६ महिन्यांपासून शास��-प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आम्हाला कोणीच दाद दिली नाही. महावितरणने जाहिरातीप्रमाणे पूर्ण ३०२ जागा भराव्यात आणि रिक्त राहिलेल्या ५०+ जागांसाठी तातडीने अतिरिक्त निवड या��ी लावावी हीच आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळवून द्या!"
महावितरण जाहिरात क्र. 07/2023 अंतर्गत पदवीधर अभियंता (वितरण) भरती प्रक्रियेत दुसऱ्या निवड यादीतील सुमारे 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थि��� राहिल्याने पदे आजही रिक्त आहेत. गुणवत्ताधारक असूनही अनेक पात्र उमेदवार संधीपासून वंचित आहेत. सरकारने जाहिरातीत दिलेल्या सर्व जागा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तात्काळ अतिरिक्त निवड यादी जाहीर करून गुणवत्तेनुसार उमेदवारांना न्याय द्यावा.
@MeghnaBordikar @Dev_Fadnavis @MSEDCL
"विविध पदांच्या भरती प्रक्रियेत महावितरणचा
महा घोटाळा...."
महावितरण प्रशासनामार्फत सन 2023 मध्ये अकाउंटंट व इंजिनिअर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांबाबतची परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये आयबीपीएस मार्फत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती. मात्र दिनांक 14 जानेवारी रो��ी सायंकाळी विद्यार्थ्यांची कुठलीही मार्कलिस्ट जाहिर न करता महावितरण मार्फत सदर भरती प्रक्रिया बाबत डायरेक्ट निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर निवड याद्या मध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसत नाही अक्षरशः निकालातील पारदर्शकतेला काळ फासण्यात आलेल आहे. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच परीक्षेत मिळालेले विद्यार्थ्यांचे गुण मात्र कुठे देण्यात आलेले नाही. तसेच नॉर्मलायझेशन कसे झाले व नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढले व कमी झाले याबाबत कुठलीही पारदर्शकता नाही. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली अक्षरशः काही विद्यार्थ्यांना 10% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आलेली आहे याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही व सदर गुण कोणत्या कोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर��शकता नाही.वेटिंग लिस्ट ही देण्यात आली नाही.महावितरण प्रशासनाने निकालातील पारदर्शला काळाफासून मोठ्या प्रमाणावर हव्या त्या उमेदवारांची घुसखोरी महावितरण प्रशासनाने केल्याचे शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. निकालाच्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात निकालाच्या पारदर्शकतेवर बोंब उठल्यानंतर महावितरण प्रशासनामार्फत सदर निकाल वेबसाईटवरून काढण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच शंका निर्माण झाल्या . याची जाणीव झाल्याने महावितरण प्रशासनाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला त्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे निकालात���ल कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, निवड यादी नंतर प्रतीक्षा यादी, आयबीपीएस चा मूळ फॉर्मेट मधील निकाल व नॉर्मलायझेशन चे गुण कुठेही जाहीर न करता दिनांक 21 जानेवारी पासून यांच्याकडून कागद पडताळणी चा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन चा) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. विशेष बाब म्हणजे ऊर्जा विभाग हा महाराष्ट्राचे पारदर्���क मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत असलेल्या मंत्रालयाचा भरती प्रक्रियेचा "पद्धतशीर कार्यक्रम" असा चालत असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं...
यापूर्वीच्या
भरती प्रक्रिये��ध्ये त्याच महावितरण मार्फत मुलांचे सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट व त्यांचे मार्क हे आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये व डिजिटल सही सोबत प्रसिद्ध करण्यात येत होते.
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RRPSpeaks @Awhadspeaks @MSEDCL @CMDMSEDCL @AjitPawarSpeaks @ibps_official @IBPSupdates @CMOMaharashtra @VijayWadettiwar @degree_holders
मा. देवेंद्र जी,
गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा ल���्ष द्यावे.
आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
१. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे
२. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे.
३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा
कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan
MIDC परीक्षा घोषणा करायला कोणता मुहूर्त शासन शोधत आहे ?
आदिवासींच्या 12500 जागा भरायला शासनाला कोण अडवत आहे ?
स���कार ने जरा शहाणपणाने वागावे , आणि आदिवासी विशेष भरती 12500 जागा जाहिरात आणि एमआयडीसी वेळापत्रक प्रसिद्ध करावे .
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
#आदिवासीजाहिरात12500
#MIDC
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM