महानिर्मिती, महावितरण ह्या दोन्ही विभागांच्या परिक्षेत हलगर्जीपणा दिसून आला असून महापारेषण सहाय्यक अभियंता (६ जुलै) परिक्षा देखील त्याच मार्गावर आहे,विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता फक्त Ion Digital या अधिकृत केंद्रांवरच परिक्षा घ्यावी व तसे परिपत्रक काढावे
#Mahatransco_at_tcs
मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
आज अमरावती येथे जलसंधारण अधिकारीच परीक्षेत उत्तरांच्या चिठ्या पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अमरावती येथील या केंद्रावर काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. सत्ताधारी पक्ष फोडून सत्ता मिळवत आहेत आणि यांचे लाभार्थी पेपर फोडून बक्कळ पैसा छापत आहेत. ह्या सगळ्या एजेंसीज सत्तारुढ़ पक्षाच्या समंधित लोकांच्या आहेत
रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ नक्की कधी थांबणार आहे? सरकार पेपर फुटिवर कायदा करून कायमस्वरूपी उपाय करणार आहे का ?
#महाज्योती च्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या जागावाढ करण्याच्या घोषणेची अनेक महिने उलटूनही अंमलबजावणी होत नव्हती; परंतु अखेर शासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घोषणेची अंमलबजावणी केली. सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि या पाठपुराव्यात सहभागी होता आलं याचा आनंद आहे.
#WCD जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेचा पेपर फुटला.
विभागाने केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यानेच #Printed_Answer उमेदवाराला पुरविल्याचा पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती लागला.असा प्रकार कित्येक केंद्रांवर झालेला असणार.तत्काळ परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी.
@SanjayDRathods