महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारन विभागाणे (outsourcing) बाह्य यंत्रणेद्वारे 1278 पदे भरण्यासाठी ई निविदेच्या जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
एकीकडे राज्यातील लाखो तरुण वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कर��न सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. वयोमर्यादा, परीक्षा पुढे ढकलणे, भरतीतील अनियमितता आणि रिक्त पदांचा अनुशेष अशा अनेक समस्यांचा सामना करत आहेत.
दुसरीकडे, सरकारी विभागातील पदे भरण्यासाठी नियमित सरळसेवा भरतीचा मार्ग न स्वीकारता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून निविदा काढल्या जात असतील, तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे?
सरकारने एक गोष्ट स्पष्ट करावी सरकारी ���ोकऱ्या कंत्राटदारांच्या माध्यमातूनच द्यायच्या असतील, तर मग MPSC, सरळसेवा भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वर्षे का खर्ची घालता?
@mieknathshinde
@shindespeaks
@SunetraA_Pawar
@PawarSpeaks
@RRPSpeaks
काल रात्री राज्याचे धुरंदर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोन करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
इतक्या दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर काल MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेची घोषणा झाली. तब्बल १६,७१७ जागांची घोषणा राज्य शासन आणि MPSC ��े अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे गेली असली, तरी आपण निवेदनातून केलेल्या मागणीनुसार ती जानेवारी महिन्यातच होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये सध्या एक प्रश्न उपस्थित होत आहे की, कोअर MPSC अर्थात नॉन-टेक्निकल (Qualification – Any Degree) पदांच्या जागांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही.
मला या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगायचे आहे, तुम्ही आता २४ जानेवारी रोजी होणाऱ्या Group-C Prelims 2026 च्या अनुषंगाने फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विश्वास देतो की, नॉन-टेक्निकल पदांच्या जागा कशा वाढ��ता येतील, यासाठी माझा पाठपुरावा कालपासूनच सुरू झाला आहे. सहकार विभाग, समाजकल्याण विभाग यांसह इतर विभागांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरती प्रक्रियेत समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा विषय काल रात्रीच देवेंजींच्या निदर्शनास आणून दिला आहे.
मित्रांनो, मला तुमच्या मेहनतीची, तुमच्या संघर्षाची आणि या परीक्षेसाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टांची जाणीव आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे या एका संधीची वाट पाहत आहेत. कोणाचे वय वाढत चालले आहे, कोणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलाच्या यशाची आशा डोळ्यांत साठवून बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागा आणि प्रत्येक संधी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
१६,७१७ जागांचा ऐतिहासिक टप्पा आपण गाठला आहे. आता नॉन-टेक्निकलच्या जागांमध्येही अपेक्षित वाढ व्हावी, यासाठी मी पूर्ण ताकदीन��� पाठपुरावा करणार आहे.
तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी तुमच्या प्रश्नांसाठी तुमचा हा सहकारी, विद्यार्थी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील!
@Dev_Fadnavis @mpsc_office @VRadhaIAS
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाविरोधात आवाज उठवणारा, पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
वैभव चव्हाण याने बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारांविरोधात तक्रार करून संबंधित प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याच्या तक्रारीनंतर जवळपास १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाल्याची माहिती समोर आली होती. अन्यायाविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एका तरुणाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होणे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण���रे आहे.
वैभवच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे? या घटनेचा आणि त्याने केलेल्या तक्रारीचा काही संबंध आहे का? त्याला यापूर्वी कोणाकड��न धमक्या किंवा दबावाचा सामना करावा लागला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
वैभव चव्हाणला न्याय मिळणे ही केवळ त्याच्या कुटुंबाची लढाई नाही, तर अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेशी आणि व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित बाब आहे..!
स्व. वैभव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
वैभव कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#JusticeForVaibhavChavan
#वैभवचव्हाण
#बीड
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थ��ा निर्माण झाली होती. मात्र, या प्रकरणात कोणतेही राजकीय गणित न मांडता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सखोल चौकशीची भूमिका घेतली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे.
याच भूमिकेतून विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी, परीक्षेचा पॅटर्न, कॉमर्स कॅडरबाबतच्या शंका-अडचणी यांसोबतच आगामी ३ जानेवारीच्या परीक्षेत इंजिनिअरिंग व इतर तांत्रिक संवर्गातील तसेच नर्सिंग सह पदांचा समावेश व्हावा आणि किमान १२ हजारांहून अधिक पदांची जाहिरात यावी, ही आग्रही मागणीही मांडली.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात पदभरतीचा मार्ग मोकळा होईल,असा विश्वास मला देवेन जींवर आहेच पण त्यासोबतच आयोगाची जबाबदारी देखील परीक्षा पारदर्शक आणि वेळेवरच होण्यासाठीची असावी अशी मागणी देखील देवेनजींकडे केली आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलनात, सोशल मीडियात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, तुमच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू..! काळजी नसावी.
तुमचाच,
निखिल पाटील
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळला!
महाराष्ट्रातील MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक आणि आशादायी निर्णय!
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भरती प्रक्रियेत पदसंख्या वाढविण्याबाबत दिलेला शब्द पाळत, उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त ���१ हजारांहून अधिक पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी हा निर्णय हजारो तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.
युवकांच्या अपेक्षांचा सन्मान करत त्यांच्या भविष्याचा विचार करणारे हे संवेदनशील आणि सकारात्मक नेतृत्व आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, आता युवकांना संधी मिळणार!
धन्यवाद देवाभाऊ🙏🏻
@DevendraFadnavis
#MPSC #Maharashtra #YouthEmpowerment
@Dev_Fadnavis
#MPSC मार्फत घेण्यात आलेल्��ा गट-अ (औषध निरीक्षक ) पदाच्या मुलाखत प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. अटकेत असलेल्या आरोपींच्या मुलाखतीसंदर्भातही प्रथमदर्शनी संशय निर्माण करणाऱ्या बाबी समोर येत असतील, तर या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आता तरी राजीनामा द्यावा नाहीतर सरकारने आयोगाच्या अध्यक्षांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून अध्यक्षांचा राजीनामा घ्यावाच.
नाहीतर राज्यात #mpsc चे विध्यार्थी या बाबतीत योग्य विचार नक्कीच करतील..!
@mpsc_office
पोलिस उपनिरिक्षक (PSI) विभागीय मर्यादित परिक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असून यामध्ये ‘मास कॉपी’, आर्थिक देवाणघेवाण, ब्लॅकल���स्टमधील नावे बेकायदा पद्धतीने वगळणे, शारिरीक चाचणीतील गैरव्यवहार, नियमबाह्य पद्धतीने ताकीद देऊन गैरप्रकार करणाऱ्यांना पात्र ठरवणं, निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोशल मिडियावर लीक होणं असे प्रकार घडले आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही न्यायिक चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं केली आणि याबाबतचं पत्रंही त्यांना दिलं.
याशिवाय ४ जानेवारी ���०२६ रोजी MPSC मार्फत घेतलेल्या गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परिक्षेत गंभीर ��ैरप्रकार झाला असून यासंदर्भातील पुरावेही त्यांच्याकडं सुपूर्द केले आणि या अनुषंगानेही सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. याची आपल्याला निश्चितच कल्पना आहे.
याच शेतकऱ्यांची मुले पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये राहून MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बि���ट असल्यामुळे या विद्यार्थ्यांना लायब्ररी फी, पुस्तके आणि अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा खर्च करणेही कठीण होत आहे.
अशा विद्यार्थ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
त्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय, अमृत यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून सरसकट विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात #विशेष_शैक्षणिक_अनुदान जमा करता येऊ शकते.
किमान लायब्ररी फी ���णि पुस्तकांच्या खरेदीसाठी तरी विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत द��यावी.
या संस्थांच्या मूळ उद्दिष्टांनुसार वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किती लाभ मिळतो, याचाही आढावा घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे किमान अशा गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या संस्थांच्या माध्यमातून ठोस आणि परिणामकारक काम होऊ शकते.
शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी अर्धवट सोडावी लागू नये, हीच शासनाकडून अपेक���षा आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय, या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.
@Dev_Fadnavis
@RahulGandhi @NANA_PATOLE @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @vishwajeetkadam
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Corrupt@mpsc_office paper leak
संदर्भात नेमलेला चौकशी आयोग केवळ एक FARCE दिसत आहे.
सुरुवातपासूनच सुरु असलेली दिरंगाई बघता "अंतिम निष्कर्ष"काय असेल याचा अंदाज आला आहे तथापि सदसदविवेक बुद्धीला स्मरून नै��िकतेने सध्या यावर मी भाष्य करणे उचित नाही.
असो...
👉 2021 पासूनच्या जवळपास सर्व परीक्षा संशयास्पद असताना
व त्यातील अनेक
गंभीर मुद्दे समोर आलेले असताना
केवळ 9 परीक्षांचा दिखावा केला जात आहे यात कुणालाच शंका नसावी
मा. @Dev_Fadnavis
साहेब आपण 9 परीक्षा व "इतर संशयित परीक्षा " असा उल्लेख केला होता याचा विसर पडता कामा नये.
🔸VIMP
@Tukaram_IndIAS
विद्यार्थ्याने माहिती /पुरावे सादर करताना त्यांनाच प्रतिज्ञापत्र ओळखपत्र मागणे म्हणजे
अधिकाधिक विद्यार्थी घाबरून समोर "न " येण्याची काळजी घेतलेली दिसत आहे.
हा सगळा खटाटोप कशासाठी??
चोर सोडून संन्यासाला फाशी देणे सुरु आहे.
पेपरफूटी जाहीर झाल्यापासून
@mpsc_office
त बसलेल्या चोरांनी व इतरांनी आतापर्यंत अनेक पुरावे नष्ट केले असतीलच व अजूनही
16 नोव्हेंबरपर्यंत त्यांना भरपूर व��ळ मिळणार आहे
चौकशी आयोगाचे 60 दिवस नेमकं कधीपासून कधीपर्यंत आहेत हे जाहीर करावे.
हा आयोग स्वतःहून कसून तपास /चौकशी करणार आहे की
फक्त 16 नोव्हेंबर पर्यंत आलेल्या
Readymade पुराव्याची छाननी करणार आहे?
विद्यार्थ्यांचा त्या आयोगातील एकमेव व्यक्तीवर @Tukaram_IndIAS
विश्वास आहे.आपण विद्यार्थ्यांना न घाबरता न
डगमगता गैरव्यवहार,गैरप्रकार चे जास्तीत जास्त पुरावे मागणे अपेक्षित होते व अजूनही आहेच.
ना की त्यांनाच प्रतिज्ञापत्र व ओळखपत्रात अडकवणे.
त्यातही आपण केवळ 9 परीक्षा
संदर्भातच अधिकृतपणे भाष्य केले.
👉 मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
साहेब हा चौकशी आयोग म्हणजे
गोरगरीब विद्यार्थ्यांचा तीव्र असंतोष,चीड रोखण्यासाठी केवळ
तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे असेच चित्र दिसत आहे
"Justice must not only be done, but must also be seen to be done"
धन्यवाद
🙏🙏
@bhimanwar
@RahulGandhi @NANA_PATOLE @INCHarshsapkal @satejp @vishwajeetkadam @VijayWadettiwar
आज #MPSC पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले महाशय म्हणे बरेच झेंडे गाडून आलेत
ASO ��दावर असतानाही Group B,C च्या परीक्षा का देतात, ते अजून कळलं नाही
आपण #Objective की #Descriptive, याच वादात अडकलोय… आणि इकडे महाशय दोन्हीकडे टॉपर्स
आता प्रश्न एवढाच—खरंच अफाट हुशारी की सगळाच गोलमाल?
महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर अनेक दिग्गज नेते आणि मंत्री होऊन गेले, परंतु लोकशाहीच्या तत्त्वांचे खऱ्या अर्थाने पालन करणारे आणि जनमताचा सर्वोच्च आदर करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल.
राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षांच्या पॅटर्न���ाबत विद्यार्थ्यांच्या भूमिकेचा विचार करताना त्यांनी अत्यंत पारदर्शक आणि लोकशाहीवादी दृष्टिकोन दाखवला. आयोगाच्या धोरणात बदल करावे लागले तरी चालतील, परंतु विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, हे त्यांनी उघडपणे मांडले. "90 टक्के आणि त्याहून अधिक विद्यार्थी Objective (MCQ) पॅटर्नची मागणी करत असतील, तर समितीच्या शिफारशीनुसार 99 टक्के लोकांच्या जनमताचा आदर करून धोरणात्मक बदल करण्यास सरकार कटिब���्ध आहे," ही त्यांची भूमिका विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारी ठरली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि भावनांचा सन्मान करणाऱ्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना एकच मोठी अपेक्षा आहे🙏
MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसेसह सर्व तांत्रिक आणि घटक परीक्षांसाठी लवकरात लवकर Objective Pattern (MCQ) लागू करून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मंगलकलश आणावा!
@VRadhaIAS @PraveenGedam @RRPSpeaks
MPSC चा भोंगळ कारभार! प्रश्नपत्रिकेवर २०२३ चा स्टिकर, खाली २०२४! नेमकं चाललंय तरी काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रश्नपत्रिकेवर २०२३ सालाचा स्टिकर लावण्यात आला आहे; मात्र तो स्टिकर काढल्यानंतर खाली २०२४ असे वर्ष लिहिलेले दिसत आहे.
नेमकी परीक्षा कोणत्या वर्षाची? २०२३ की २०२४?
राज्यातील लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे या परीक्षांसाठी खर्च करतात. अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नपत्रिकांबाबत एवढा निष्काळजीपणा कसा काय केला जातो?
परीक्षा व्यवस्थेतील साध्या बाबींमध्येही स्पष्टता नसेल, तर विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास तरी कसा ठेवाय��ा?
MPSC म्हणजे केवळ परीक्षा घेणारी यंत्रणा नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील अधिकारी घडवणारी संस्था आहे. मग प्रश्नपत्रिकेवरील वर्षाबाबतच एवढा गोंधळ असेल, तर या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित कोण घेणार?
या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित प्रश्नपत्रिकेवरील वर्षातील विसंगतीचे कारण स्पष्ट करावे. जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि विद्यार्थ्यांना अधिकृत खु���ासा द्यावा.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही! MPSC ने या प्रकाराचे उत्तर द्यावे!
#MPSC #MPSCExam #विद्यार्थ्यांचेभविष्य #MPSCकारभार #स्पर्धापरीक्षा
@CMOMaharashtra
Maharashtra Paper Leak Service Commission च्या आणखी एका अधिकाऱ्याला #Paperleak संदर्भात काल अटक झाली.
कुंपणाने हक्काने शेत खाल्ले आहे हेच वास्तव होय.
मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis
साहेब मी पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणून देतोय हा विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून साधारणतः 2021 पासून झालेल्या प्रत्येक परीक्षेचा आहे.
👉Paper Leak Mafia / Racket / syndicate प्रामाणिकपणे शोधायचे असेल तर 2021 पासून @mpsc_office
च्या "सरसकट" परीक्षा संदर्भात कसून ���ौकशी व्हायलाच हवी.
हीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे व तो त्यांचा अधिकार व हक्क आहे.
🔸नेमलेला चौकशी आयोग फक्त विशिष्ट् परीक्षांचीच चौकशी व तपास करणार असेल तर
झालेल्या गंभीर घटना आगामी काळात घडतच राहणार यात तिळमात्र शंका नसावी.
प्रत्येक गोष्टीचे विद्यार्थ्यांकडेच पुरावे मागणे हे देखील अयोग्य च होय.
@Tukaram_IndIAS
आपल्याकडून सर्वांना प्रामाणिक अपेक्षा आहेत, 2021 पासूनच्या च���कशीत अनेक गंभीर गोष्टी घबाड सापडल्याप्रमाणे मिळतील "शोधा म्हणजे सापडेल"
पकडला तोच चोर व समोर आला तितकाच घोटाळा पुर��ा हा विषय नव्हे याची आपण गंभीरतेने नोंद घ्याल अशी
प्रामाणिक व माफक अपेक्षा करतो.
धन्यवाद 🙏
@bhimanwar
@RahulGandhi
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@satejp @vishwajeetkadam
MPSC पेपरफुटी प्रकरणात आज आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्केला अटक झाली आहे. अटक झालेला आयोगातील हा चौथा अधिकारी आहे. आयोगासह मंत्रालयात असे अनेक महाभाग आहेत, मोठं रॅकेट आहे आणि हेच आम्ही वारंवार सांगत आलो आहोत, पुरावे देत आलो आहोत.
अजून तर न्यायिक आयोगाची चौकशी सुरू देखील झालेली नाही. एकदा चौकशी सुरू होऊ द्या, सर्व महाभाग समोर येतील. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खेळ मांडणाऱ्या एका��ी महाभागाला सोडणार नाही, मग तो कोणीही असो, कितीही वरपर्यंत पोहोचलेला असो वा कोणाचाही कितीही जवळचा मित्र असो. आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणाशिवाय हा लढा थांबणार नाही.
असो, या रोहित कोलटक्केचा कोणकोणत्या परीक्षांमध्ये सहभाग आहे, याचाही शोध घेण्यात यावा.
#MPSC_पेपरफुटी #MPSCScam #MPSCExamScam #MPSCशुद्धीकरण #JusticeForMPSCStudents
मा. @mpsc_office 2026-27 चे वेळापत्रक बनविताना ग्रुप C 2026 (जा. क्र. 017/2026) ची मुख्य परीक्षा ही 3 जानेवारीच्या पूर्व परीक्षेनंतर 60 दिवसांत नियोजित करावी. परीक्षाआधीच 4 वेळेस पोस्टपोन झाल्यामुळे अक्षरशः 6 महिने उशिराने भरती प्रक्रिया चालू आहे. मा. आयोग आपणास विनंत�� आहे.
राज्यसेवा २०२७ : विद्यार्थ्यांचे भवितव्य की व्यावसायिक टेंडरचे अर्थकारण?
राज्यसेवा २०२७ ही वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीनेच व्हावी हा केवळ पद्धतीचा प्रश्न नसून, ग्रामीण,कष्टकरी व बहुजन विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाच��� आणि पारदर्शकतेचा लढा आहे. पण दुर्दैवाने हा निर्णय होऊ नये म्हणून आज कोचिंग क्लासेसचे तथाकथित ‘ विष्णूगुप्त/कौटिल्य’ आणि सारथी, बार्टी, टार्टी, अमृत, महाज्योती संस्थांच्या टेंडर्सवर गब्बर झालेले क्लास चालक पडद्यामागून सर्व शक्ती पणाला लावत आहेत.
यामागील खरा हेतू काय?
उद्देश एकच—जास्त फी आणि कोट्यवधींच्या टेंडरमधून गब्बर उत्पन्न लाटणे!
निकालाला कितीही वर्षे लागोत, पेपर नीट तपासले ��ावोत अथवा न जावोत, आणि सदोष मूल्यमापनामुळे प्रकरणे हायकोर्टात वर्षानुवर्षे का सडेनात... यांना विद्यार्थ्यांच्या वयाचे, संघर्षाचे किंवा सामाजिक बांधिलकीचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. विद्यार्थी हितापेक्षा यांचे 'स्वहित' आणि गल्ला महत्त्वाचा ठरत आहे.
मूल्यमापनातील (Evaluation) कडवट ��ास्तव:
खुद्द उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांच्या अनिच्छेतून आणि अनुभवातून हे उघड सत्य समोर आले आहे की—तुम्ही कितीही क्वालिफाईड शिक्षक आणला तरी हजारो डिस्क्रिप्टिव्ह उत्तरपत्रिका गांभीर्याने तपासण्यात कोणालाही स्वारस्य नसते. तपासणाऱ्याच्या त्यावेळच्या मानसिकतेचा, स्वभावाचा आणि कामचुकारपणाचा थेट फटका प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्याला बसतो. वस्तुनिष���ठ पद्धतीत (Objective) या मानवी दोषांना, पूर्वग्रहाला आणि भ्रष्टाचाराला थारा उरत नाही.
आंदोलन म्हणजे केवळ 'मनोरंजन' नव्हे!
इतर आंदोलनाप्रमाणे आमच्या आंदोलनात केवळ टाळ्या मिळवणे, फटकेबाजी करणे किंवा मनोरंजन करणे हा आमचा हेतू कधीच नव्हता. जेव्हा लाखो विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लागले होते, तेव्हा भाषणबाजी ऐकण्यापेक्षा ठोस धोरणात्मक मागण्या मांडणे गरजेचे होते.
आम्ही सुरुवातीपासून ठामपणे मांडत आलो आहोत:
१. राज्यसेवा परीक्षा पूर्णतः वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीनेच व्हावी.
२. मानवी पूर्वग्रह आणि वशिलेबाजी टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण जेवढे कमीत कमी असतील तेवढे विद्यार्थी हिताचे आहे .
स्पर्धा परीक्षा व्यवस्था ही काही मंडळींची कमाईची जहागीर नाही. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहणे थांबवून पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा निर्णय शासनाने व आयोगाने तातडीने जाहीर करावा!
#Mpsc #MPSC #mpsc
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
@cbawankule @ChhaganCBhujbal
@RVikhePatil @ChDadaPatil @girishdmahajan
@NaikSpeaks @MPLodha @SanjayDRathods @samant_uday
@JaykumarRawal @Jaykumar_Gore
@Pankajamunde @save_atul @advakash @ShelarAshish @bharanemamaNCP
@iAditiTatkare @SanjayShirsat77
@PratapSarnaik @NiteshNRane
@babasahebpati1 @Ashishjaisw3Adv @madhurimisal @MeghnaBordikar @naikindranil @iYogeshRKadam @mohol_murlidhar @khadseraksha
@DrSEShinde @parthajitpawar @purveshsarnaik @dhananjay_munde @RealBacchuKadu @OmRajenimbalkr @DrPritamMunde @AbhiPawarBJP @mipravindarekar @KDMahadik @niranjandtweets @SMungantiwar @DrBhagwatKarad
@EA_OfficialMH
मा.@mpsc_office 2027 चे परीक्षा वेळापत्रक बनविताना ग्रुप C 2026 मुख्य परीक्षा(जा.क्र 017/2026) ही 3 जानेवारी नंतर 60 दिवसांत नियोजित करावी.4 वेळेस परीक्षा पोस्टपोन झाल्यामुळे आधीच 6 महिने अक्षरशः वाया गेलेत.
राज्यात दुष्काळ पडलाय.भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी.
@BaliramDoleyINC
😎😎MPSC पेपरफुटीचा आणखी एक पुरावा..! गट ब 2025 = 60 लाखात paper फुटला🔥🔥🔥🔥
💰 ६० लाखांत १ पेपर,१०० पैकी ९० गुण अन् ६१ दुय्यम निबंधक SIT च्या रडारवर.🔥🔥
मा.@Dev_Fadnavis साहेब तत्काळ MPSC चौकशी समितीला रीतसर अधिकार द्या.
💵 आर्थिक उलाढाल लक्षात घेता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. 💯
Exam #रद्द कर���न विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.✅
@RRPSpeaks
@Tukaram_IndIAS
@andharesushama
@mpsc_office
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@LoksattaLive
https://t.co/hKX5BJPStu