#MPSC आयोग ची साधस्थिती पाहता वेळेवर निकाल नाही, परीक्षाप्रकिया वेळेवर नाहीत आयोगा बद्दल मुलांमध्ये विश्वासार्था कमी होतेय. मा @Tukaram_IndIAS सर सारख्या प्रामाणिक आणि धडाकेबाज निर्णय घेण्याऱ्या अधिकाऱ्यांची मा. आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
स्टाफ सिलेक्शन अर्थात SSC चे परीक्षा केंद्र कसे आहेत ते एकदा बघून घ्या. आपण राज्यात असणाऱ्या परीक्षा केंद्राबाबत अशाच तक्रारी केल्या आहेत. तिकडे केंद्रातील मोदी सरकार सुद्धा तरुणांवर याच प्रकारे अन्याय करत आहे.
सदरील घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आणि बेरोजगार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे त्यामुळे दोषींवर नवी मुंबई महानगरपालिकेने तत्काळ गुन्हे दाखल करून सदरील प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे हे शोधून काढणे गरजेचे आहे.
आज एका विद्यार्थ्याचा मेसेज आला तो रोज मजुरी करून शिक्षण घेत आहे तसेच सरळसेवा चे पेपर सुद्धा देत आहे. त्याने त्याची काल झालेली आपबिती सांगितली. आपले लाडके गृहमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक परीक्षांची फीस ही 1000 केली आणि परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या आणि सेंटर पण खाजगीच आहेत. ह्याच परीक्षा जर @mpsc_office घेतल्या असत्या तर फिस ही 350 रुपये असती ती पण अनेक पेपरची. सुविधा पण चांगल्या आणि सेंटर पण आप आपल्या जिल्ह्यातच भेटले असते आणि सर्व यंत्रणा ही शासकीय जिल्हाधिकारी यांच्या अंडर होती. काही जरी झाला असता तर त्याला जबाबदार जिल्हाधिकारी असते. पण या 350 मधील एक रुपया ही वरती सरकार ला भेटला नसता म्हणून फक्त परीक्षा ह्या खाजगी कंपनी कडे आहेत. टेंडर मध्ये कमिशन, फीस मध्ये वाटा नंतर घोटाळे हे वेगळेच तिथे तर जागा वाटून दिल्या जातात. ही सत्य परिस्थिती आहे जी मी तुम्हाला सांगत आहे. या सर्व गोष्टीमुळे फक्त गोर गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारला विनंती आहे तुम्हाला खाण्याचे ठिकाण खूप आहेत किमान या गोर गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी तरी तुम्ही खेळू नका. जो पैसा तुम्ही खाजगी कंपन्यांना देताय त्याच्या अर्धाच पैसा #MPSC कडे द्या आणि त्यांना कर्मचारी वाढून द्या. सरकारी शाळांचे जे हाल केले ते खाजगी कंपन्या पोसण्यासाठी MPSC चे करू नका. शक्य तितक्या लवकर परीक्षा ह्या आयोगाकडे द्या ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Devendra_Office
विरोधी पक्ष पण जिवंत आहे असे कुठे तरी असे आम्हाला वाटूद्या. या प्रश्नांबाबत आवाज उठवा.
@PawarSpeaks@RRPSpeaks@INCHarshsapkal@AUThackeray@Awhadspeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@Dhananjay4INC
ट्रिपल इंजिन सरकारचं हेच का ‘सुपरफास्ट गव्हर्नन्स’?
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब,
आपल्या स्वतःच्या ठाणे महापालिकेतच भरती नाही,
निम्मी पदं रिकामी आहेत, आणि जनता सेवावंचित आहे.
हेच का ट्रिपल इंजिन सरकारचं कामगिरीचं इंजिन?
की फक्त फोटो, पोस्टर, आणि जाहिरातीत गती —
जमीनीवर मात्र ठप्प यंत्रणा आणि थांबलेला प्रशासनाचा श्वास!
आम्ही मागणी करतो —
तातडीने ठाणे महापालिकेची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करावी,
अन्यथा ‘ट्रिपल इंजिन सरकार’चे तीनही इंजिनं अपयशाचं प्रतीक ठरतील!
#TripleEngineFailure
#ThaneMunicipalCrisis
मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis आपण गृहमंत्री या पदाचा चार्ज घेतला की जे पेपर फुटी मध्ये सहभागी होतात ते खूप खुश होतात कारण त्यांना माहिती आहे तपास काही होतच नाही. नुसते नावाला FIR होते आणि जे सुरवातीला पकडले जातात तेवढेच आरोपी राहतात त्याच पुढे काय होते हे सर्वांना माहिती आहे. आपली निष्क्रियता यांनी चांगली ओळखली आहे कृपया आपल्या खात्याकडे लक्ष द्या. आपण स्वतः मागील सरकार मध्ये गृहमंत्री असताना कबुल केले होते 48 FIR झाल्या आहेत मग एकदा त्या 48 केस ची प्रोग्रेस काय झाली ते पहा पण वरवरचे नका पाहू स्वतः लक्ष देऊन पहावे मग तुम्हाला समजेल आपण किती निष्क्रिय आहोत आणि मुलांवर किती अन्याय होत आहे.
आम्ही तलाठी भरतीचा घोटाळा उघडकीस आणला यात 200 बोगस मुले सापडली असती. सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील पहिले 2 टॉपर आम्हीच पकडून दिले आणि शेवट पर्यंत तेच आरोपी झाले त्याच्यापुढे तपास गेलाच नाही. म्हणजे पुरावे आम्हीच दिले, आरोपी आम्हीच सांगितले मग पोलीस करताय काय? धाराशिव पोलिसांनी पैसे खाऊन तलाठी भरतीची केस दाबली आणि कसलाच तपास केला नाही. परीक्षा ह्या ऑनलाईन असतात याचा तपास वेळेत केला तरच योग्य कारवाई होते पण आपली निष्क्रिय यंत्रणा पैसे खाऊन मस्तावली आहे. 200 प्रामाणिक मुलांचा प्रश्न होता तो आज ते बोगस मुले नोकरी करत आहेत. याला जबाबदार फक्त तुम्ही आणि तुमचा सरकार आहे हे लक्षात घ्या.
आता पर्यंत परीक्षा बाबत ज्या पण काही FIR झाल्या आहेत त्याबाबत एक SIT स्थापन करा आणि तपास होऊ द्या एवढी माफक अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Devendra_Office@mieknathshinde@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra @OsmanabadPolice @OmRajenimbalkr@RRPSpeaks@satejp@bb_thorat@AUThackeray@anjali_damania@waglenikhil@Dhananjay4INC
. @mpsc_office च्या कारभाराचे वाभाडे काढणारी & स्पर्धा परीक्षार्थींच्या मनातील भावना व्यक्त करणारी कविता व्हायरल झाली आहे.
आयोगानं फक्तं UPSC चा अभ्यासक्रम कॉपी करून भागणार नाही, तर UPSC प्रमाणे कारभार पण गतिमान करायला हवा.🙏
मा. देवेंद्र फडणवीस जी ,
एका महिन्यात परीक्षार्थीला १२ गुणांवरून वरून थेट २०० गुण मिळणे म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही, ही तर घोटाळ्यांची Olympic स्पर्धा झाली!
धाराशिवच्या पेपरफुटीत पोलीस कारवाई काय झाली? इथेही तोच खेळ? जेव्हा सरकारच आरोपींच्या बाजूने उभे राहतात, तेव्हा हजारो विद्यार्थ्यांचा विश्वासघात करून “उध्वस्त झालेली स्वप्ने” तुमच्या पारदर्शकतेची किंमत असते!
तुमचं नाव इतिहासात ‘स्पर्धा परीक्षा व्यवस्थेचा कसाई’ म्हणून लिहिलं जाईल हे निश्चित!
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
Akash sewakram Patle यांना 200 मार्क पडल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
कारण त्यांनी खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यांना या आधीच्या अकाऊंट या पदासाठी फक्त 12 मार्क पडले होते. खूप कमी वेळात खूप चांगला अभ्यास केला आहे आणि आम्हाला TCS/ IBPS वरचा विश्वास अजून दृढ झाला आहे. खरंच खूप पारदर्शक परीक्षा होत आहेत. आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि आकाश सारखे मुले जिद्द चिकाटी आणि एका महिन्यात झीरो चे हिरो होऊन जातात कमाल आहे.
माय बाप सरकार बघा किती पारदर्शक परीक्षा होत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांनी जीव द्यावा का? हे फक्त एक उदाहरण आहे.
आम्ही कितीही पुरावे दिले कितीही गुन्हे नोंद केले तरी आपली पोलीस यंत्रणा मॅनेज होतेच कारण धाराशिव मध्ये तलाठी पेपर फुटीच्या केस मध्ये आम्ही अनुभवला आहेच. पोलीस कसे मॅनेज होतात ते एक उत्तम उदाहरण आहे. कारण तिथे जवळपास 200 बोगस विद्यार्थी सापडले असते तिथे यांनी तपासच केला नाहीये.
राज्याचे ग्रहमंत्रीच @Dev_Fadnavis असे आहेत तर पोलीस तरी काय करणार ना. अजून वेळ गेली नाहीये बघा यावर काय करता येते का?
@DGPMaharashtra @OsmanabadPolice
@OmRajenimbalkr@PatilKailasB
मा. मंत्री महोदय, अनेक वर्षांपासून ST महामंडळात मेगाभरती झालेली नाही. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी #बेरोजगार असून, महामंडळाच्या नोकर भरतीची वाट बघत आहेत.
आपल्या कार्यकाळात #MPSC किंवा TCS/IBPS मार्फत मेगाभरतीच्या जाहिराती काढून पारदर्शक नोकरभरती राबविण्यात यावी. तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गातील सर्व पदे तत्काळ भरण्यात यावीत ही नम्र विनंती.
@msrtcofficial@mieknathshinde@DrSEShinde .
लाखो पदे रिक्त असताना नोकरभरती नाही.
राज्यातील युवा बेरोजगारीने त्रस्त आहेत. शंभर-दोनशे जागांसाठी चार ते पाच लाख अर्ज येत आहेत. तब्बल तीन लाख पदे रिक्त असतानाही राज्य सरकारने नवीन #सरळसेवा_जाहिराती काढणे जवळपास बंदच केलं आहे.
#MPSC राज्यसेवा आणि संयुक्त गट-ब/क जाहिरातीत तुटपुंज्या जागा देण्यात आल्या आहेत. या दोन्ही जाहिरातीत #जागावाढ करण्यात यावी.
नगरपरिषद, महसूल, गृह, आरोग्य, वन, वैद्यकीय शिक्षण, शिक्षक, अभियांत्रिकी अशा अनेक विभाग आणि संवर्गातील हजारो जागा रिक्त आहेत.
लाडक्या बहिणींमुळे आमच्या जाहिराती थांबवू नका, सरकारला विनंती आहे लवकरात-लवकर नवीन जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RRPSpeaks@AUThackeray@CMOMaharashtra@INCHarshsapkal@MahaChiefSec@mpsc_office@AbhiPawarBJP@PatilKailasB@SakalMediaNews .
'शासकीय सरळसेवा (वर्ग-०३) नोकरभरती #MPSC आयोगाकडे दिली', अशी घोषणा करून वर्ष झाले तरी प्रत्यक्षात आयोगामार्फत एकही नवीन भरती झालेली नाही. TCS/IBPS मार्फतच भ्रष्ट भरती सुरू आहेत.
फक्त घोषणा करायच्या आणि विसरून जायचं असा एकूण @Dev_Fadnavis सरकारचा कल आहे.
#आयोगाच्या फेररचनेचे आम्ही स्वागत करतो, परंतु याबाबतची #Timeline काय? आयोगाकडे सरळसेवा परीक्षा देताना प्रत्येक विभागातील पदांचे नवीन संवर्ग करून स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात याव्यात.
आयोगाकडे नव्याने देण्यात येणाऱ्या परीक्षा संयुक्त : गट-ब आणि गट-क जाहिरातीत घालू नये अशी आमची मागणी आहे. उमेदवारांना जास्त वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध व्हावी.
प्रत्यक्षात सर्व सरळसेवा परीक्षा आयोग कधीपासून घेईल याचं उत्तरं अजूनही राज्यातील लाखो विद्यार्थांना मिळालेलं नाही. राज्य सरकारने यथाशिघ्र सर्व सरळसेवा भरती आयोगाकडून कशा घेता येतील याबाबत मार्ग काढावा.
अनेकदा कोणतीही न्यायालयीन अडचण नसताना आयोगाने जाहिराती किंवा निकाल प्रसिद्ध केलेले नाहीत. उमेदवारांचा वेळ नाहकपणे वाया जाता नये म्हणून आपण दिलेले #Tentitive वेळापत्रक UPSC प्रमाणे काटेकोरपणे पार पाडण्यात यावं. याबाबत दिरंगाई करणाऱ्या आयोगातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम, खुद्द आयोगातील उच्च-अधिकाऱ्यांचे आहे.
@CMOMaharashtra@MahaChiefSec@Maha_GoodGovern@AbhiPawarBJP@RRPSpeaks@PatilKailasB@mpsc_office@AUThackeray @Dhananjay_AAP
आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांपेक्षा #विद्यार्थांच्या#आत्महत्या जास्त होत आहेत,यात सर्वाधिक प्रमाण बेरोजगारांचे आहे.
देशभरात विकसित राज्य म्हणून मिरवणाऱ्या #महाराष्ट्राला आपली मान शरमेने खाली घालायची वेळ आली आहे.
#फडणवीसांच्या चुकीच्या धोरणांची किंमत बेरोजगारांना मोजावी लागत आहे.
महाराष्ट्रातील एका आमदारावरील सरकारी खर्च...
मूळ पगार 67,000
दूरध्वनी 8000
स्टेशनरी 8000
संगणक चालक 10,000
खाजगी सहायक 25,000
ड्रायव्हर 15,000
अधिवेशन काळात प्रतिदिन 2000
महागाई भत्ता धरुन 3 लाखाच्या आसपास पगार एका आमदाराला मिळतोय.
शिवाय सध्या मुंबईत सरकारी घरे आमदारांना उपलब्ध नसल्यामुळे लाखो रूपये घरभाडे दिलं जातंय.
निवृत्तीवेतन ५०,०००
मृत आमदाराच्या पती / पत्नीला ४०,०००
विमान, रेल्वे प्रवास मोफत उपलब्ध.
दवाखान्याचा 100% खर्च सरकार करतंय.
गाडी-घरासाठी बिनव्याजी कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा#तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे.
तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल.
राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो
#विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू.
परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे.
#दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे.
अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो.
निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू.
#महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही.
महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साहेब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा.
राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल @RRPSpeaks@bb_thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ.
कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !!
@RVikhePatil@Dev_Fadnavis@maharevenue@ssaunik@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@VijayWadettiwar@SVW790@AbhiPawarBJP@niranjandtweets@KunalNitinRaut@supriya_sule@PatilKailasB@rajushetti@Ravikanttupkar1@Prksh_Ambedkar@RajThackeray@ShivSenaUBT_@NANA_PATOLE@abpmajhatv@saamTVnews@zee24taasnews@girishkuber@bbcnewsmarathi@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@satejp@satyajeettambe@IYCMaha@INCMaharashtra@BJP4Maharashtra@NCPspeaks@jdipali@drsujayvikhe@Jayant_R_Patil