राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra
#MPSC पेपर फुटीपासून अज्ञातवासात गेलेले अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य लक्षपूर्वक वाचा.
ह्या @mpsc_office चे व सरकारचे नेमकं चाललंय काय???
किती हा विरोधाभास
@bhimanwar@Dev_Fadnavis
👉एकीकडे ऑक्टोबर च्या अखेरीस नियोजित गट -क परीक्षा पारदर्शकतेचे कारण देऊन
पुढे ढकलली.मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे कारण सांगितले.
मग 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पारदर्शकता नको आहे काय???
👉 ती परीक्षा वेळेवर घेण्याचे कारण काय आहे??
वेळेवर घेण्यास आमचा विरोध नाही व नसेल.
परंतु तत्पुर्वी #MPSC अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद घ्यावी.
त्यातून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुर्णपणे पारदर्शकच होईल,त्यातील कोणतीच प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, फुटणार नाही, कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार झाला नाही /होणार नाही ह्याची हमी द्यावी.
त्यानंतरच परीक्षा घ्यावी.
कधी घेताय पत्रकार परिषद?
👉 तपासापूर्वीच पेपर फुटला नाही सांगून तक्रारदारालाच कारवाईची धमकी देणारे सचिव महेंद्र हरपाळकर पेपरफुटी झाल्याचे जाहीर झाल्यापासून कुठे गायब आहात?
मध्यंतरी एकदा तुम्हाला
काळं फासलं तेंव्हाच news मध्ये झळकलात त्यानंतर पुन्हा गायबच
( काळं फासण्याचे समर्थन कधीच नाही पण ही वेळ तुमच्यावर का आली ह्याचा विचार केला का??)
जबाबदारी व नैतिकता तर तुमच्याकडे नाहीच हे तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेच आहे.
तुमच्यापैकी एकालाही पेपर फुटी नंतर तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल आयोगाची भूमिका व्यक्त करावी वाटली नाही.
👉 तुमचेच 3 अधिकारी( सध्या सापडलेले, अजून किती समोर येतील सांगता येत नाही )पेपर फोडतात आणि तुम्ही सगळे लपून बसलात अजूनही, तुम्ही सर्व दोषीच आहात हेच अंतिम सत्य आहे.
कहर म्हणजे तुमच्यातला एकही जण स्वतःहून पद सोडायला तयार तर नाहीच पण तुमच्यावर कसली कारवाई नाही.
वरून
"ये दोस्ती हम नही छोडेंगे "म्हणत तुमची पाठराखण होत आहे.
यामागचे गौडबंगाल काय आहे?
👉 पेपर फक्त एका विद्यार्थिनीकडे गेला असे खोटं सांगणाऱ्या सर्वांना कालच crime branch ने तोंडावर पाडले आहे.
👉 तात्काळ 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात भूमिका जाहीर करा.
महाराष्ट्रातील एकही स्पर्धा परीक्षा उमेदवाराचा तुमच्यावर विश्वास उरला नाही याची गंभीरतेने नोंद घ्या.
@RahulGandhi@prithvrj@NANA_PATOLE@INCHarshsapkal@vishwajeetkadam@satejp
@imDNerkar Descriptive पॅटर्न पण चांगला आहे यात दुमत नाही परंतु सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. उत्तरपुस्तिकेचे evaluation करण्यासाठी standard सेट केला पाहिजे .normalisation व्यवस्थित झाले पाहिजे.एकंदरीत UPSC सारखी परीक्षा पद्धती गरजेची आहे
@VRadhaIAS@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra
नमस्कार मॅडम.... 🙏🙏
खालील निवेदन वाचावे ही नम्र विनंती....
एमपीएससी ची तयारी करणारा सामान्य कुटुंबातील व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची मागणी.....
खाली एक वोटिंग पोल घेण्यात आला आहे ते आपण नक्की पहावे... 👇👇
Thank you सुधीर ठाकरे सर objective pattern कसा प्रामाणिक, पारदर्शी, विश्वसनीय आहे हे सांगितल्या बद्दल, राज्यसेवा 2027 objective pattern नेच होणार 💯
#mpscobjective
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवाभाऊ यांच्या पहिल्या Term मध्ये (2014-2019) कधीही विद्यार्थी आंदोलन वा मोर्चा निघाला नाही...त्याचे कारण कदाचित "Objective Pattern !" असू शकते.
नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन समिती अध्यक्ष व सध्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी समिती आली...या समितीने विद्यार्थ्यांशी एकदाही चर्चा केली नाही मात्र UPSC चे Classes चालवणाऱ्या विविध क्लास चालकांच्या मंचावर जाऊन Descriptive कसा चांगला हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि नंतर UPSC चा Pattern जसाच्या तसा Copy-Paste करून तत्कालीन आयोगाचे अध्यक्ष व आत्ताचे रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी लागू केला.
त्यानंतर MPSC क्षेत्रात काय गोंधळ सुरू झाला ते आपण पाहिलेच आहे...
त्यामुळे महाविकास आघाडीची (बाजारू क्लासचालकांची) दळवी समिती चांगली की देवाभाऊंची राज्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून चर्चा करून सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असणारी V. राधा समिती चांगली...? याचा सर्वांनी विचार करणे संयुक्तिक !
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
सब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या विरोधात एमपीएससी विद्यार्थी एकवटले पुन्हा एकदा Objective पॅटर्न राज्यसेवा 2027 पासूनच.. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो..
https://t.co/CPqdBiNoOf
सविस्तर बातमी वाचा
याचे उत्तर तथाकथित विद्यार्थ्यांच्या राजकीय नेत्यांनी द्यावे..!!
व्ही. राधा समिती सध्या विभागा-विभागात जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचं म्हणणं ऐकून सूचना घेत आहे.
मग एक साधा प्रश्नय, तत्कालीन चंद्रकांत दळवी समितीने असं राज्यभर फिरून विद्यार्थ्यांशी किती संवाद केला होता? कोणकोणत्या घटकांचं म्हणणं ऐकलं होतं?
आणि जर एवढा सगळा अभ्यास केला होता, तर महाराष्ट्राच्या राज्यसेवेसाठी UPSCच्या धर्तीवर अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आणताना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा, इथल्या प्रशासनाचा आणि स्थानिक गरजांचा स्वतंत्र विचार नेमका कुठं झाला?
विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विषय आहे साहेब…
फक्त UPSC कडं बघून चालत नाही; महाराष्ट्राच्या लेकरांकडं पण बघावं लागतं.!
@mpsc_office