जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
@maharevenue@cbawankule@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra
२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
@SanjayDRathods साहेब जलसंधारण विभागाचा आकृतीबंध कधी प्रसिद्ध होणार आहे?
अनेक वेळा घोषणा करून अद्याप आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. आपणास विनंती आहे लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा.
@Maha_GoodGovern@CMOMaharashtra@naikindranil
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Maha_GoodGovern
सरकारला सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे स्टेनोग्राफर पद ही मृत घोषित करू नये. गेली पाच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत अचानक असे केल्यास खूप विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. स्टेनोग्राफर मृत घोषित न करता पद भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे.
@My_MBMC सदर पदभरती आमदार @iNarendraMehta यांच्या मागणीनुसार स्थगिती दिली मग ज्या सामान्य लोकांनी यांना निवडून दिले त्या बेरोजगार मुलांच्या मागणीचे काय? कंत्राटी लोकांना नक्की कोण आश्रय देतय? तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@JadhavMns
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil@MeghnaBordikar
सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि @Dev_Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.
एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
२ ते ४ वर्षे कठोर परिश्रम करणारे विद्यार्थी आज वयोमर्यादा, स्पर्धा आणि अनिश्चिततेच्या कचाट्यात अडकले आहेत. रिक्त पदांचा मोठा आकडा समोर असतानाही सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, कृती मात्र शून्य आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये वाढत असलेली नैराश्याची भावना ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने याकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ लघुलेखक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, ही ठाम मागणी आहे.
तरुणांच्या भविष्याशी तडजोड चालणार नाही.
आता आश्वासन नको - निर्णय हवा!
@mpsc_offical
#MPSC #Students #Recruitment #Maharashtra
जे मुलं भरती प्रक्रिया च्या प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना सेवेत न घेता खाजगी संस्थाद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा अट्टहास कशासाठी ? खाजगी उमेदवार न घेता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.@cbawankule@Dev_Fadnavis
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही?
@girishdmahajan@RVikhePatil