आई मेली, बहीण तडपून मेली, स्वतः कॅन्सर ग्रस्���..
#MPSC आंदोलकमन सुन्नी करणारी नरेंद्रची व्यथा 🥹💔
नांदेड मधील युवक
स्वतःच्या हक्कासाठी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करतोय..
कुठं फेडालं हे पाप 🫡
#MPSC_विद्यार्थ���_सत्याग्रह #MPSCआंदोलन #Pune #महाराष्ट्र
#MPSC आंदोलनात PMC JE चा मुद्दा उपस्थित केला गेला, PMC ने नियुक्त्या देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं असं समजू नये!
PMC JE उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. विद्यार्थी हा मुद्दा विसरलेले नाहीत!
@navalMH@prajytnair@PMCPune@RRPSpeaks@CMOMaharashtra
टेक्निकल परीक्षा सुद्धा objective पॅटर्न नेच झाले पाहिजे. 🔥
गट क 2026 ��ध्ये अभियांत्रिकी विभागाचे सर्व जलसंपदा, जलसंधारण, बांधकाम, पाणीपुरवठा, महसूल, वन या सर्व जागा तातडीने भरण्यात याव्या तसेच गट अ, गट ब 2027 रिक्त पदांचा समावेश असावा.
तांत्रिक संवर्ग ( कृषी/#FSO/ अभियांत्रिकी) देखील #Objective करण्यात यावी..
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती ��िक्त पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी......!
@EA_OfficialMH @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @yogsara
@RahulAsks सर आपण एक निष्पक्ष पत्रकार आहात कृपया आपण यामध्ये "MES 2023" मुख्य परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका देखील पाहून घ्या काही फोटो खाली शेअर केले आहेत, हे पुरावे विद्यार्थ्यांनी #SIT ला देखील दिलेले आहेत आणि अशा जवळपास ८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडे आहेत आणि ते उमेदवार सद्यःस्थितीत माननीय उच्च न्यायालयात देखील खटला लढत आहेत त्यामुळे आपणास नम्र विनंती की आपण कृपया जे Sufferer आहेत त्यांची बाजू देखील दाखवावी.
खाली काही फोटो दिले आहेत आपण कृपय��� पाहून घ्या अशा ८० पेक्षा जास्त उमेदवारांच्या ��ूळ उत्तरपत्रिका उमेदवारांकडे आहेत. गुणांचे मूल्यांकन, मॉडेल उत्तरपत्रिका असे अनेक मुद्दे आहेत आपण ज्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलल्यानंतर समजून जाईल.
खालील सर्व गोष्टी बघा आणि सांगा आम्ही अभ्यास का करायचा....?
#Objective परीक्षा पद्धती ही अत्यंत्य पारदर्शक आणि गतिमान आहे... याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
#Mission_objective
तुम्ही म्हणता सरकारी नोकरी गरिबी हटावचा कार्यक्रम नाही .पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की
सरकारी नोकरी हा 'गरीबी हटाओ'चाच कार्यक्रम का ठरू शकत नाही? सरकारने शेतकऱ्यांच्या पोरांच्या फायद्याचा असलेला ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) पॅटर्नच आणला पाहिजे!
तुम्ही कोचिंग क्लासवाले स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ज्या MPSC कडे स्वतःची स्वतंत्र इमारतसुद्धा नाही – तिच्याकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा हट्ट धरत असाल, तर गरीब विद्यार्थ्यांनी सोप्या अन् पारदर्शक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी का करू नये? आम्ही काय भीक किंवा फुकट नोकरी मागत नाही आहोत!
सरकारी नोकरी क्लार्कची असो की Class-1 ची, ती एका गोरगरीब घरातील पोराला खेचून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून बसवण्याची ताकद ठेवते! थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर कराड कोर्टात क्लार्क म्हणून र���ब��े, पण त्याच नोकरीच्या जिद्दीवर त्यांनी आपलं कुटुंब सावरून समाज ढवळून काढणारी कामे केली!
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनीसुद्धा आपल्या करिअरची सुरुवात क्लार्क म्हणूनच ठोकली होती! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सैन्यात होते; त्यांच्या त्या स्थिर उत्पन्नाच्या जीवावरच बाबासाहेब एवढं भव्य शिक्षण घेऊ शकले! आणि जगातील सर्वोत्तम संविधान लिहून आज आम्हाला आमच्या या मागण्यांसाठी आवाज उठवण्याची धगधगती ताकद दिली, ती याच संविधानाने दिली आहे!
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जसा फक्त कोचिंग क्लासवाल्यांचाच आर्थिक फायदा आणि धंदा दडलाय, तसंच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये गोरगरीब, कष्टकरी पोराला मुख्य प्रवाहात आणून उभं करायची खरी ताकद आहे!
OBJECTIVE २०२७ 🔥
@EA_OfficialMH @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC
@MeshramDayanand काही क्लास चालक वर्णनात्मक परीक्षा पद्धती किती थोर आहे असे विद्यार्थ्यांवर बिंबवून तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांपेक्षा कशे उच्च आहात असा आभास त्यांच्या मनात निर्माण करत आहेत.
@MeshramDayanand अगदी बरोबर सर. सध्या MPSC ही Upsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची "पुनर्वसन केंद्र" बनली आहे. आणि सर Mpsc च्या जाहिरातीत फार क्वचित Dc,dysp च्या जागा निघतात इतर परीक्षा होते ती BDO,CDPO सारख्या वर्ग 2च्या पदांसाठी मग यासाठी Upscच्या दर्जाची मुख्य परीक्षा लादण्याचा अट्टाहास का?
#MMRDA परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात सरकारने १९ ऑगस्ट रोजी SIT नेमकी होती, या SIT चं काय झालं? चौकशी अहवाल आला का? नसेल तर कधी येणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
'गतिमान' सरकारचं प्रशासन इतक्या कासव गतीने काम का करतंय?
@Dev_Fadnavis@mieknathshinde
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्���ाने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्या��च्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
आजच्या घडीला राज्यसेवा आयोगाला पेपरफुटीचं ग्रहण लागलं असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आयोगाचे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आयोगातील भ्रष्टाचाराचे क्लीनअप शक्यच नाही. भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच���छ प्रतिमेची व्यक्ती या पदावर बसवणं, सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे ७० हजार पदांची पदभरती तत्काळ सुरु करणं, १०० रुपयात वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी २७ सप्टेंबर पासून आंदोलन पुकार��े आहे.
सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखायची असतील, सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज्याच्या सिस्टीममध्ये येणारे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांची निवड करणारी यंत्रणा देखील पारदर्शक असावी लागते. त्यामुळं आयोगाला ग्रहण लावणारे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा गरजेचाच आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत, त्यामुळं २७ तारखेपासून सुरु ���ोणाऱ्या या अभूतपूर्व आंदोलनाला, विद्यार्थ्यांच्या एकजुटीला, युवाशक्तीला ताकद देण्यासाठी सर्वांनीच पाठींबा द्यावा. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल जी गांधी, ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब, मा. उद्धव ठाकरे साहेब हे देखील विद्यार्थ्यांच्या लढ्याच्या पाठीशी उभं राहून ताकद देतील, असा विश्वास आहे.
विद्यार्थी- क्लासचालक, telegram Channel चालक यांना धमक्या आणि नोटीसा देणं पुणे पोलिसांनी थांबवावं, नोटीसा द्यायच्याच असतील तर मला द्या. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळं कितीही नोटीसा द्या, परवानगी नाकारा, कितीही दबाव टाका, कट–कारस्थानं रचा… विद्यार्थ्यांचं आंदोलन होणार… म्हणजे होणार…
तारीख २७ सप्टेंबर..
सकाळी नियोजित वेळेत..
एस. एम. जोशी मार्ग..
पुणे.
#MPSC #विद्यार्थी_आंदोलन #पेपरफुटी
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी,
@Dev_Fadnavis
🔶 आज आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना स्��ष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सूचना आहेत आणि समितीने शिफारस केली तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याचा सरकार सकारात्मक विचार करेल.
सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
🔶 मुळात दळवी समिती ही राजकीय वरदहस्त असलेली आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली समिती होती. त्यांच्या शिफारशींबाबतही विद्यार्��्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र, या वादात न जाता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, त्या समितीच्या निर्णयातून निर्माण झालेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या गोंधळातून मार्ग काढण्याची भूमिका आपण घेत आहात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे.
🔶 आम्ही २०२२-२३ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी हा लढा लढत आहोत. विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरताना आम्ही सातत्य��ने नैतिकता जपली. या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण येऊ दिले नाही.
🔶 सरकारकडून दिलेल्या आश्वासनाचा आदर करत आम्ही नैतिकतेच्या भूमिकेतून एक वर्ष संयमाने वाट पाहिली. मात्र, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची अंमलबजावणी अपेक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम राहिल्या आणि आम्हाला पुन्हा ही मागणी घेऊन आंदोलन करावे लागले.
पण ही मागणी आणि दिलेले आश्वासन तातडीने अंमलात आले नाही, तर आजपर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठा लढा आम्ही रस्त्यावर लढू, एवढे मात्र नक्की.
🔶 आज आपण या पूर्णतः अराजकीय मागणीची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहात, याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.
@maha_governor
@MahaDGIPR
@mpsc_office
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam @satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18_marathi
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @GondaneDevesh
राज्यसेवेसकट बाकीच्या सगळ्या ��ेवांच्या परीक्षा सब्जेक्टिव्ह ठेवायच्या की ऑब्जेक्टिव्ह, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
दोन्ही पद्धतींचे फायदे-तोटे काय आहेत, विद्यार्थ्यांना नेमकं काय सोयीचं पडेल, परीक्षा पारदर्शकपणे आणि व्यवस्थित कशा घेता येतील, यावर सविस्तर बोलणं झालं.
विद्यार्थ्यांचं भलं कशात आहे, हे पाहून आणि विद्यार्थ्यांची मतं-भावना जाणून घेऊनच याबाबत निर्णय घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर तो सरकारच्या कानावर घालायचा, आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करायचा,हीच आपली भूमिका..!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
ही आहे विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आणि #विद्���ार्थी_एकजुटीचा_Impact!
२६ तारखेपासून आंदोलन करण्याची काल सकाळी विद्यार्थ्यांनी घोषणा करताच सरकारने काल संध्याकाळी ६५ हजार पदभरतीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु केवळ कागदोपत्री घोडे हलवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात पदभरतीची जाहिरात काढून कृती हवी आहे.
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, ७० हजार पदांच्या मेगाभरतीला सुरुवात आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन अभूतपूर्व असेल....ही एकजूट अशीच राहू द्या. विद्यार्थ्यांची हीच एकजूट सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भा�� पाडेल.
#MPSC #विद्यार्थी_एकजूट #पदभरती #विद्यार्थी_आंदोलन
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.
भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाणे २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या!
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ताकद द्यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आयोगाच्या एकूणच कार्यपद्��तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच आगामी 'राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६' च्या प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संशय आणि अस्वस्थता आहे. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याची ही रास्त चिंता आहे.
या परीक्षेच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने परीक्षा प्रक्रिये�� पारदर्शकता आणि सुरक्षा आणण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय परीक्षा सुधार समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशी आणि त्यातून अपेक्षित ठोस सुधारणा लागू होण्यापूर्वीच आयोग परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? याबाबत आयोगाला शासनाचे काही स्पष्ट निर्देश आहेत का? हे कळत नाही. या पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेले तत्कालीन अधिकारी यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन किंवा छपाईच्या प्रक्रियेशी कोणत्याही स्तरावर संबंध नव्हता, याची ठोस व लेखी खात्री आयोगाने विद्यार्थ्यांना दिली आहे का?
या विद्यार्थ्यांची मागणी आहे की, जर प्रश्नपत्रिकांच्या संपूर्ण गोपनीयतेबाबत आयोगाकडे निर्विवाद खात्री नसेल, तर हे जुने पेपर तात्काळ रद्द करून स्वतंत्र व सुरक्षित यंत्रणेद्वारे नवे पेपर तयार करण्यात याव���त. यासाठी अतिरिक्त वेळ लागत असल्यास मुख्य परीक्षा पुढे ढकलली तरी चालेल, कारण संभाव्य गैरप्रकारामुळे गुणव���त विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा परीक्षा काही दिवस उशिरा झाली तरी चालेल अशी विद्यार्थ्यांची मानसिकता असल्याचे दिसते.
मुख्यमंत्र्यांनी फेरतपासणीचे तोंडी आश्वासन दिले असले तरी आयोगाकडून कोणतीही अधिकृत भूमिका वा परिपत्रक जाहीर झालेले नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर या संभ्रमित वातावरणामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. विद्यार्थ्यांची मागणी अत्यंत स���पष्ट आहे की, प्रक्रियेत पारदर्शकता आणा आणि गोपनीयतेची हमी द्या; मगच परीक्षा घ्या. आयोगाने व राज्य शासनाने यावर तातडीने अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून विद्यार्थ्यांसमोर खरी वस्तुस्थिती मांडावी. विद्यार्थ्यांच्या कष्टाशी आणि विश्वासाशी प्रतारणा करु नये, अशी आमची भूमिका आहे.
@CMOMaharashtra @mpsc_office
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#PMCJE चौकशी व दोषींवर कारवाईचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. विश्वास ठेवला, पण अजून अंमलबजावणी नाही. उलट नियुक्त्या सुरू आहेत.
मग आम्ही न्यायासाठी जायचे कुणाकडे? आमच्या मेहनतीचं आणि भविष्याचं काय? आश्वासन नको, कृती हवी. आधी चौकशी, मग नियुक्त्या!