खूप खूप धन्यवाद @SanjayDRathods साहेब. साहेब आपणास एक विनंती आहे की डिसेंबर २०२५ पर्यंत TCS/IBPS या कंपनीच्या मार्फत सरळसेवा भरती करण्याची परवानगी आहे त्यामुळे गट क आणि गट ब (अराजपत्रीत) पदभरती जलद गतीने पार पाडण्यासाठी TCS/ IBPS मार्फत राबवण्यात यावी.
माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी ३००० पदांची घोषणा करून आता पाच महिने उलटून गेले आहेत अद्याप पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही यामुळे कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
#WCD_3000
१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागाने देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment@SanjayDRathods
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जाहिरात प्रसिद्ध करायची आहे परंतु जलसंपदा विभागाचे स्वतःचे सेवा प्रवेश नियम नसताना त्यांचे नियम वापरण्याचा अट्टाहास का बर धरला असेल? भरती नक्की येणार आहे की नाही याची तरी स्पष्टता विभागाने बेरोजगारांना द्यावी ही विनंती
#MJP_JE@CMOMaharashtra
आज राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १२४ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४०२ पदे, सहाय्यक अभियंता (स्था.) श्रेणी २ ची ८२ पदे अशी एकूण ६०६ पदे रिक्त आहेत, परंतु सदरील पदांची भरती प्रक्रियेसाठी मात्र शासन टाळाटाळ करत आहे.
शासनाच्या या उदासीन धोरणामुळे मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या #civil च्या विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. दुसरीकडे नगरविकास खात्याच्या सहायक #नगररचनाकार साठीच्या १४८ जागांचे मागणीपत्र प्राप्त असूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. #मुंबई_मनपा अभियांत्रिकी विभागाची भरती देखील झालेली नाही. शासनाने सर्व विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया सुरु करावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरी शासनाने आता विद्यार्थ्यांना छळणे बंद करून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध कराव्यात ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#भरतीप्रक्रिया | #EngineeringJobs | #StudentDemand |
मा. @mpsc_office
सरळसेवा विविध परीक्षांचे निकाल लागले आहेत. क्लर्क मध्ये तेच उमेदवार रिपीट होण्याची शक्यता आहे. तर मा.आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 रेशीओ घेऊन जास्तीत जास्त उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून जागा रिक्त राहणार नाहीत.
@Dev_Fadnavis जी मराठा आरक्षणासह आपण 5 दिवसांत पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली मग @IqbalSinghChah2 तुम्हाला का जमत नाही? हजारो बेरोजगार अभियंते 1000 रिक्त पदांसाठी चातका सारखी जाहिरातीची वाट बघताय. @mieknathshinde जी लक्ष घाला. नाहीतर पोरं निर्णय घेतील?