शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
आधी चातक पक्षासारखी कित्येक वर्ष शिक्षक भरतीची वाट पाहिली आणि आता कठोर परिश्रमानंतर शिक्षक झालो, तर शिक्षण सेवकाच्या नावावर ही वेठबिगारी आमच्या जीवावर उठली आहे आजही आम्ही चातक पक्षासारखे तुमच्याकडे पाहत आहोत #EknathShinde ,#शिक्षण_सेवक_रद्द_करा#DevendraFadnavis
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
केसरकरसाहेब 30 हजार पहिल्या टप्यात व दुसऱ्या टप्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे सांगितले 22 हजार पदाची जाहिरात आलेली असून त्यापैकी 10600 पदाची भरती झालीच नाही म्हणून व्यक्त व्हा.
रविवारी 11 ते 1 PM
हॅशटॅग
#प्रलंबितशिक्षकभरती_पूर्णकरा#नवीनसंचमान्यता_धोरण_रद्दकरा