मूलतः OBJECTIVE पॅटर्न हा मा. माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण सरांचा आहे. त्यांनी हा पॅटर्न आणण्यासाठी श्री. सुधीर ठाकरे सरांची नेमणूक केली आणि कित्येक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदांवर गेले. ती स्थिरता परीक्षेत टिकवून ठेवायची असेल तर एकच उपाय आहे: ऑब्जेक्टिव्ह २०२७.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC
#MPSC मुख्य परीक्षा #objective2027 पाहिजे! वर्णनात्मक परीक्षेची पद्धत रद्द करून 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीनेच घेण्यात यावी, ही आमची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे. पारदर्शकता, समान संधी आणि निष्पक्ष मूल्यमापनासाठी #Objective परीक्षा हाच योग्य पर्याय !
आज Twitter War 🔥 पाहून कोचिंग माफियाला घाम फुटला आहे.
सर्वांनी ताकद लावा, ऑब्जेक्टिव्ह २०२७ झालीच पाहिजे! कोचिंग माफिया संपलीच पाहिजे!
फक्त प्रामाणिक शिक्षक वर्ग❤️ जो नेहमी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत आला आहे आणि काही नालायक विद्यार्थ्यांनी ट्रोल केले तरी आपल्यासाठी उभा राहिला ❤️ असे शिक्षक नेहमी आदरणीय राहतील.
OBJECTIVE २०२७ 🔥
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BaliramDoleyINC@MahaDGIPR@GaneshgSpeaks
MPSC मध्ये नायब तहसीलदार सारख्या Class-२ पदासाठी,ज्या पदावर एक तलाठी पदोन्नतीने देखील पोहोचू शकतो ,अशा रँकसाठी UPSC (IAS आणि IPS) ला असणारा अभ्यासक्रम जसाच्या तसा (As it is) कॉपी करणे अत्यंत चुकीचे आहे.
UPSC मध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवावा म्हणून MPSC मध्ये UPSC चा अभ्यासक्रम आणावा, हा जो तर्क दिला गेला होता, तो आपल्या संघराज्य पद्धतीला (Federal System) धक्का देणारा आहे. महाराष्ट्र राज्य हे संविधानाने निर्माण केलेले राज्य आहे आणि आपण संघराज्य संरचनेचे जतन केलेच पाहिजे.
राहिला प्रश्न UPSC मध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का वाढवण्याचा, तर त्यासाठी 'SIAC' सारख्या संस्था आहेत. MPSC ही एक घटनात्मक संस्था (Constitutional Body) आहे, तिचे काम राज्यासाठी परीक्षा घेणे हे आहे; UPSC मध्ये महाराष्ट्रीयन टक्का वाढतोय की नाही हे पाहणे MPSC चे काम नाही.
आणि २०२५ च्या मुख्य परीक्षेत आलेले Straight forward प्रश्न पाहिले, तर हे जाणवते की प्रश्नांचा दर्जा हा F.Y.B.A. ला विचारल्या जाणाऱ्या पातळीचा होता. अशी तयारी करून कोणताही विद्यार्थी UPSC पास करू शकणार नाही.
राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ (Objective) च झाली पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रात मराठी माणसाचा टक्का वाढेल!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nikhil_A_Patil@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@Dhananjay4INC@dhananjay_munde@NiteshNRane
आज ऑब्जेक्टिव्हच्या न्याय्य मागणीसाठी इतक्या अल्प कालावधीच्या सूचनेवर (Short Notice) आपण ट्विटरवर २ तासांसाठी मोहीम राबवली होती. सर्वांनी यात अतिशय आश्चर्यकारक सहभाग घेतला. केवळ २ तासांत 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा लागू करावा' या बाजूने जवळपास १२ हजारहून अधिक (१२,०००+) ट्विट्स झाले!
केवळ २ तासांत सर्व विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक वर्ग आणि सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार! आज आपल्याला आपली खरी ताकद समजली की, प्रत्येक विद्यार्थ्याची मागणी एकच आहे 🔥 ऑब्जेक्टिव्ह २०२७.
पण हा लढा इथेच थांबणार नाही! जोपर्यंत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपली मागणी पूर्ण करत नाहीत आणि २०२७ पासून राज्यसेवा तसेच सर्व तांत्रिक परीक्षांना ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या हक्काची मागणी करतच राहू!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@Nikhil_A_Patil@Dhananjay4INC@dhananjay_munde@yogsara
धनंजय शिंदे सर, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मागणी करणारे काही माजी-UPSC उमेदवार आणि कोचिंग माफियातील काही लोक फोन करून खोटी माहिती देत आहेत की, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मागणी करणारे विद्यार्थी जास्त आहेत. परंतु मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही स्वतः तुमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर किंवा ट्विटरवर 'ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिप्टिव्ह' असा पोल (Poll) घ्या. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी हे ऑब्जेक्टिव्ह (MCQ) पॅटर्नच्या बाजूने आहेत.
@Dhananjay4INC@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks
2025 मेन्स exam झाली, मार्क कमी जास्त,पेपर ASO ने check केले म्हणून रिचेकिंग ला गेले.
2026 अजून मेन्स बाकी मग त्याची पेपर चेकिंग..किती वेळ?
देवाभाऊ ला या सर्व गोष्टी समजल्या म्हणून objective 2027 पासून पुन्हा येईल,v Radha मॅडम न्याय देतील
@Dev_Fadnavis@VRadhaIAS#Objective
क्लासेस #माफियाने उघडपणे समितीच्या संपर्कात आहेत असे सांगून समितीची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.....समितीवर आपला प्रभाव आहे हेही लपवून ठेवले नाही.
@Nikhil_A_Patil@Objective2027@RamVSatpute
विद्यार्थ्यांचे हित, मेहनत आणि भविष्य लक्षात घेऊन MPSC मध्ये Objective Pattern पुन्हा सुरू करावा. विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा!
@Dev_Fadnavis@maha_governor@mpsc_office
📢 एकच मागणी — Objective Pattern सुरू करा!
#ObjectivePattern
कोचिंग माफियांना आता कळून चुकले आहे की ज्या नवीन युवा विद्यार्थ्यांना ते फसवत होते, त्यांनासुद्धा परिस्थिती समजली आहे आणि तेसुद्धा आता 'OBJECTIVE'च्याच बाजूने बोलू लागले आहेत. तसेच आमच्या बाजूने निखिल दादा पाटलांसारखे एक विश्वासू युवा नेतृत्व उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना हे समजले आहे की आता जवळपास OBJECTIVE होण्यातच जमा आहे. पण आता ते नवीन नॅरेटिव्ह (अफवा) पसरवत आहेत की आम्हाला 'कूलिंग ऑफ पीरियड' द्या, लगेच २०२७ ला लागू करू नका.
तर त्यांना सांगतो, तुम्ही नेहमी त्या UPSC चे दाखले देता ना? तर UPSC ने जेव्हा जेव्हा अभ्यासक्रम बदलला किंवा आधी जे २ ऑप्शनल होते त्यातील एक रद्द केला, किंवा CSAT फक्त क्वालिफाइंग केला, तेव्हा त्यांनी कोणता कूलिंग ऑफ पीरियड दिला नव्हता! आणि MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आधी एकच २०० प्रश्नांचा पेपर व्हायचा (ज्यात १५० प्रश्न GS आणि ५० प्रश्न C-SAT असायचे), तेव्हा त्यांनी अचानक २ पेपर केले—पेपर १ (GS) आणि पेपर २ (C-SAT).
त्यामुळे आता २०२७ पासूनच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होण्यात विद्यार्थ्यांचे हित आहे.
@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@yogsara