मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष करत आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Mpsc_Andolan
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी @Dev_Fadnavis आणि @mpsc_office तात्काळ लक्ष द्यावे.
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प्रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून जावे लागले आहे.
सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेलेल्यांना अभ्यासासाठी नियमानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
📍कंबाईन जागा वाढ साठी आणि राज्यसेवा पुढे जावी यासाठी रुपाली ताई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे
📍आदरणीय ताईंना विनंती आहे की आंदोलनात पुढील तिन्ही मागण्यांचा समावेश करण्यात यावा
१) राज्यसेवा पुढे जावी
२) कंबाईन जागा वाढ
३) क्लर्क च्या मुलांना लवकरात लवकर जॉइनिंग द्यावी
📍ताई तुम्हीच नेतृत्व करावे ही तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची इच्छा आहे, तरच यामध्ये सरकार लक्ष घालून काही तरी तोडगा काढेल कारण तुम्ही सरकार मध्ये आहात.
#combinejagavadh
#rajysevapostpone
#clerkjoining
@mpsc_office@PawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@supriya_sule@RRPSpeaks@MahebubShaikh20
DeclareClerk2023Result
(MPSC) Clerk 2023 परीक्षेची जाहिरात होऊन तब्बल अडीच वर्षे उलटली, तरीही अंतिम निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही! लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे, . मा. आयोगाने तातडीने निवड यादी जाहीर करून या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय द्यावा.result